सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी त्याचा मित्र तिथे उपस्थित होता; पोलिसांनी केला खुलासा

मुंबई | सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आतापर्यंतच्या तपासात सुशांतच्या मृत्यूचे कारण जीव गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अशातच पोलिसांकडून सतत होणाऱ्या चौकशीमुळे सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानीने थेट वांद्रे पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी सिद्धार्थ पिथानी त्याच्या घरी उपस्थित होता.

पोलिसांना चौकशीदरम्यान समजले की, सिद्धार्थ पिथानी सुशांतबरोबर त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता.

दरम्यान, अभिनेत्री संजना सांघी यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. सुशांतच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.