…तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार

मुंबई : काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. अशातच पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. मनसुख हिरेन यांचा पोस्टमार्टम अहवाल जाहीर करा आणि मगच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका मनसुख यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.

पोस्टमार्टम अहवाल, मनसुख यांच्या मृत्यूचं कारण आधी जाहीर करा आणि पोस्टमार्टम करतांना केलेलं चित्रीकरण आम्हाला दाखवा, अशीही मागणी मनसुख हिरेन यांचे कुटुंबीय करत आहेत. या मागण्या पूर्ण केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊ, असे म्हणत मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.

दरम्यान, मनसुख यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पाठवलं होतं. आता या पत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर असलेली गाडी मनसुख यांच्या मालकीची असल्यानं त्यांची चौकशी सुरू होती. आपण पीडित असूनही पोलिसांकडून एखाद्या आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला होता.

महत्त्वाच्या बातम्या 

इनकम टॅक्स वाचवण्यासाठी बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत: ला वेश्या घोषित केले होते

इंग्लंडचा दारुण पराभव करत भारताची वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या फायनलमध्ये धडक

‘पुजा चव्हाणचा लॅपटॉप आणून द्या’, पुणे पोलिसांनी भाजप नगरसेवकाला पाठवली नोटिस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.