इशारा नक्की कोणाला याबद्दल संभ्रम; काँग्रेस नेत्याचा मोदींना चिमटा

 

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लडाखचा अनपेक्षित दौरा केला. यावेळी त्यांनी उपस्थित जवानांशी संवाद साधून भारतीय जवानांचे धैर्य वाढवले.

दरम्यान नरेंद्र मोदींनी जवानांशी संवाद साधताना चीनचे एकदाही नाव न घेता त्यांना गर्भित इशारा दिला आहे. याच प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींना चिमटा काढला आहे.

“पंतप्रधान आज लडाखला गेले आहेत, तिथून चीन आणि पाकिस्तानची बॉर्डर जवळ आहे, ते नेमकं कुणाला उद्देशून बोलले याबद्दल संभ्रम आहे”, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींना लगावला आहे.

चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींना चिमटा काढला आहे. “परवा मोदींनी अन्नधान्य वाटपाची घोषणा केली, पण ते देशाला उद्देशून भाषण होतं का?

देशाला उद्देशून भाषणाचं त्यांनी इथून पुढे गांभीर्य राखायला हवं”, असा सल्ला देखील त्यांनी मोदींनी यावेळी दिला. दुसरीकडे विस्तारवादाचे युग आता संपले आहे, असा इशारा देत हे युग विकासवादाचे असल्याचे मोदींनी चीनला ठणकावून सांगितले आहे.

विस्तारवादाचा संपूर्ण जगाला धोका आहे असे सांगत भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरचा खर्चही आता तिपटीने वाढवले आहेत, असे देखील सांगायला मोदी विसरले नाहीत.

त्याचबरोबर आजपर्यंत आपण एकत्र मिळून प्रत्येक कठीण आव्हान परतवून लावले. यापुढेही आपण मिळून प्रत्येक संकटावर विजय मिळवत राहू, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.