जनतेचे हाल बघवत नाही म्हणून आमदाराने रेमडेसिवीरसाठी एफडी तोडून दिले ९० लाख

राज्यात आलेल्या लाटेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. असे असताना राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा निर्माण होत आहे.

असे असताना आता आमदार संतोष बांगर यांची चर्चा राज्यभरात सुरु आहे. रेमडेसिवीरचा तुडवडा निर्माण झाल्याने संतोष बांगर यांनी थेट आपले फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाखांचे खाजगी विरकाला उपलब्ध करुन दिले आहे.

राज्यभारात कोरोनाचा कहर सुरु आहे. कुठे औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती कुठलाही विचार न करता आपल्या मतदार संघाच्या नागरीकांच्या काळजी पोटी आणि जीव महत्वाचा आहे म्हणत संतोष बांगर यांनी एका आमदाराचे कर्तव्य पार पाडले आहे.

आधीही रेमडेसिवीर इंजेक्शनची समस्या निर्माण झाली होती, तेव्हा त्यांनी ९०० रुपये दराने ५०० रेमडेसिवीर इंजेक्शन आणून मोफत वाटले होते. त्यानंतर तुडवडा निर्माण झाल्यानंतर किंमत आणखी वाढली, तेव्हा संतोष बांगर यांनी १८०० रुपयांनी इंजेक्शन्स आणून वाटले.

अशातच हिंगोली जिल्ह्यातील रेमडेसिवीरचा पुन्हा स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती रक्कम वेळेत मिळेल का नाही? याची चिंता वितकरांना होती, त्यामुळे कोणीही पुढे येत नव्हता. अशा स्थितीत ही गोष्ट संतोष बांगर यांना कळाली.

बांगर यांनी ऑर्डर देण्याचे खुप प्रयत्न केले पण त्यातून समस्या सुटत नव्हती. त्यामुळे अखेर संतोष बांगर यांनी आपले फिक्स डिपॉझिट तोडून ९० लाख रुपये खाजगी वितरकास उपलब्ध करुन दिले आहे. त्यामध्येही बांगर यांचे ५ ते ६ लाखांचे नुकसान होणार आहे.

सध्याचा हा कोरोना काळ खुप वाईट आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी जे शक्य आहे, तेवढे करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. वार्डात फिरतो, तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाही. त्यामुळे इंजेक्शन्सची अडचण दुर करण्यासाठी हा छोटासा मदतीचा प्रयत्न आहे, असे संतोष बांगर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

नवरीच्या डोळ्यात दोष म्हणत लग्नाला दिला नकार, मग मुलीच्या घरच्यांनी नवरदेवाला धु धु धुतला
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी पदाधिकारीच आरोपी
रुग्णांच्या मदतीला मंत्र्यांची मुलं सरसावली; कोणी मारतंय झाडू, तर कोणी उचलतंय गाद्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.