भिजण्यापासून वाचण्यासाठी वडिलांनी मुलाच्या डोक्यावर धरली छत्री; एसटीच्या दुरूवस्थेची निघाली लक्तरे

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. आताही एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक वडिल आपल्या मुलाला आणि स्वत:ला पावसापासून वाचवण्यासाठी छत्री घेऊन एसटीमध्ये बसलेले आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये परिवहन महामंडळाच्या बसची दुरवस्था झाली आहे. हे अवस्था दाखवून देणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो परभणी ते हिंगोली धावणाऱ्या बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा आहे.

या एसटी बसच्या टपावरुन पाणी गळत होते. त्यावेळी आपल्या मुलाला आणि स्वत:ला त्या पाण्यात भिजण्यापासून वाचवण्यासाठी एका माणसाने चक्क बसमध्येच छत्री धरली आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व बस बंद होत्या. अशात काहीच दिवसांपूर्वी बससेवा सुरु झालेली आहे. पण बस सतत एकाच जाग्यावर उभ्या असल्यामुळे बसमध्ये अनेक अडचणी उद्धभवत आहे. असे असतानाच एका बसच्या टपावरुन पाणी लिकेज होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हिंगोली बस डेपोतील तब्बल ५८ बसच्या टपावरुन पाणी लिकेज होत आहे. परीणामी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पाणी पडत आहे, त्यामुळे आता अशा परिस्थितीत प्रवास कसा करायचा? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

दरम्यान, व्हायरल झालेला फोटो परभणीहून हिंगोलीला जाणाऱ्या बसमधला आहे. या बसमध्ये बसलेले हे प्रवासीसुद्धा हिंगोलीच्या दिशेने जात होते. पण त्यावेळी अचानक बसच्या टपावरुन पाणी लिकेज होऊ लागले. त्यामुळे त्या प्रवाशांनी छत्रीच्या साहाय्याने स्वत:ला भिजण्यापासून वाचवले आहे.

हिंगोली आगारातील अनेक बसांना वेदर स्ट्रिप लावून पावसाचे पाणी थोपवण्याचा आगाराचा प्रयत्न दिसून आला. याविषयी आगार प्रमुखांना विचारणा केली असता बहुतांश बसेसला वेदर स्ट्रिप बसवण्यात आल्या आहे. तसेच बस गळत असल्याची दिसून येत असताच त्यांची दुरुस्ती केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

तब्बल ९६ कंपन्यांचे मालक आहेत रतन टाटा, त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून अवाक व्हाल
तुमच्यात हिंमत असेल तर ‘त्या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा; राजू शेट्टींचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज
‘चंद्रकांत पाटलांची क्षमता पैशात मोजू नका, त्यांनी १०५ आमदार निवडून आणले आहेत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.