महाराष्ट्रातील(Maharashtara) विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला(Hindusthani Bhau) मंगळवारी अटक करण्यात आली होती. हिंदुस्थानी भाऊला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेत असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊने आज सर्व विद्यार्थ्यांना एक आवाहन केले आहे.(hindusthani bhau message to student)
हिंदुस्थानी भाऊच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत तो स्वतः एखादा व्हिडिओ प्रसिद्ध करत नाही आणि आंदोलन करण्यास सांगत नाही, तोपर्यंत कुणीही कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शने करू नयेत, असे आवाहन हिंदुस्थानी भाऊने सर्व विद्यार्थ्यांना केले आहे. वकिलांनी हिंदुस्थानी भाऊची भेट घेतल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) शेअर केला आहे.
काही लोक माझ्या नावाने आराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे माझ्या सर्व चाहत्यांना आवाहन करतो की आपापल्या घरी राहा. कोणतेही ट्वीट, व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवू नका”, असे आवाहन हिंदुस्थानी भाऊने केलं आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, मी आताच भाऊची भेट घेऊन आलो आहे. त्याच्या सांगण्यावरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करत आहे, असे वकिलांनी सांगितले आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर आंदोलन केलं होतं. महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी आंदोलन केलं होत. या आंदोलनाआधी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ विद्यार्थ्यांना चिथावत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवरून मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला मंगळवारी अटक केली. हिंदुस्थानी भाऊला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर समाजमाध्यमांत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. बुधवारी दुपारी मोठ्या संख्येने धारावी पोलीस ठाण्याच्या परिसरात विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, असे या व्हिडिओमध्ये म्हटले होते.
या व्हिडिओमुळे पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये, यासाठी धारावीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या दरम्यान हिंदुस्थानी भाऊने वकिलांमार्फत विद्यार्थ्यांसाठी एक संदेश दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओ, ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवू नका. मी जोपर्यंत बाहेर येत नाही, किंवा एखादा व्हिडिओ जारी करत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शने करू नयेत, असे आवाहन त्याने त्या व्हिडिओमध्ये केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम अंजली भाभी पैशांसाठी करायची ‘हे’ काम, स्वत:च केला होता खुलासा
द्रविड-सचिनच्या मुलानंतर ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलानं गाजवलं मैदान, शतक ठोकत संघाला मिळवून दिला विजय
बॉलिवूड अभिनेते अमिताभ यांचं निधन, मृत्यूच्या ४ दिवस आधीचा व्हिडीओ झाला व्हायरल