VIDEO: हिंदूस्थानी भाऊला पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण…

सोशल मीडियावर हिंदूस्थानी भाऊ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हे वृत्त विरल भयानी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे.

या पोस्टमध्ये भयानी यांनी असे म्हटले की, हिंदूस्थानी भाऊ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करत होता. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्या, त्यासाठी हिंदूस्थानी भाऊ आंदोलन करत होता.

हिंदूस्थानी भाऊ म्हणजे विकास पाठक बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होता. तसेच कोरोनामुळे आता विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी करत होता. त्यासाठी तो आंदोलन करत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सध्या राज्यभरात कोरोनाचे संकट आहे. अशात परीक्षा घेणे योग्य नाही. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला नाही पाहिजे. तसेच सध्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची फी माफ केली पाहिजे, असेही विकास पाठकने म्हटले आहे. त्यावेळी आंदोलन करत असल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, हिंदूस्थानी भाऊ त्याच्या व्हिडिओमुळे खुप चर्चेत आला होता. त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो देशात घडणाऱ्या वेगवेगळ्या मुद्दयांवर आपले मत मांडायचा. त्याच्या मत मांडणाच्या स्टाईलमुळे तो खुपच प्रसिद्ध झाला आहे.

अशात हिंदूस्थानी भाऊचे व्हिडिओ आक्षेपार्ह असल्याचा दावा करत पुनित शर्मा नावाच्या व्यक्तीने भाऊ विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या किती मानधन घेतात ‘इंडिअन आयडल १२’ चे परीक्षक नेहा, विशाल आणि हिमेश रेशमिया?
रात्री झोपण्यापूर्वी ‘दुधामध्ये’ लसणाच्या पाकळ्या टाकून खाल्यास होतील ‘हे’ जबरदस्त फायदे
झोपण्यापूर्वी उशीखाली लिंबू ठेवल्यास आयुष्यातील ‘या’ त्रासांपासून नक्की मुक्ती मिळवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.