Share

Hindustani Bhau : ‘जी बाई बाळासाहेबांना थेरडा बोलली त्यांच्यासोबत तुम्ही जाणार?’ राज ठाकरेंना हिंदुस्तानी भाऊचा रोखठोक सवाल

Hindustani Bhau  : सध्या राज्यात मराठी भाषा (Marathi Language) आणि हिंदी भाषा यांच्यावरून मोठा राजकीय वाद सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्ते मीरारोड (Mira Road) येथील एका व्यावसायिकाला मराठी न बोलल्यामुळे मारहाण करताना दिसणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारावर आता हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) यांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना थेट उद्देशून अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

मराठीचा अभिमान, पण हिंसाचार नको

हिंदुस्तानी भाऊ यांनी व्हिडिओद्वारे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटलं की, “मराठी ही भाषा आपल्यासाठी माज आहे, गर्व नाही. मात्र, या मराठीच्या नावावर इतर राज्यांतून आलेल्या हिंदू बांधवांवर (Hindu Community) हात उचलणे चुकीचे आहे. शिक्षण संस्थांमध्ये मराठी भाषा शिकवणे गरजेचे आहे, त्यासाठी आंदोलनही करा, पण गोरगरीबांवर अन्याय होऊ देऊ नका.”

इतर राज्यांतील मराठी माणसांवर काय परिणाम होईल?

त्यांनी राज ठाकरे यांना विचारलं की, “जर इतर राज्यांतील लोकांनी आपल्या मराठी बांधवांवर अशा प्रकारे वागणूक दिली तर काय होईल? एकत्र आणणे कठीण आहे, पण फोडणे सोपे आहे. हिंदुत्वासाठी एकत्र या, हेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं स्वप्न होतं.”

राजकीय युतीवर सवाल

भाऊने स्पष्टपणे म्हटलं की, “ज्या पक्षातील नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ‘थेरडा’ म्हटलं, त्यांच्यासोबत राज ठाकरे यांनी युती करणं दुर्दैवी आहे. ‘श्रीराम’ बाबत जे चुकीचं बोलले, त्यांच्यासोबतही युती योग्य नाही.”

त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून सांगितले की, “हे कठोर वाटेल, पण सत्य आहे. राज ठाकरे यांच्याकडून हिंदू समाजाला आशा आहे. त्या अपेक्षांचा आदर करावा. हेच बाळासाहेबांचे खरे विचार आहेत.” हिंदुस्तानी भाऊने शेवटी भावनिक आवाहन करत म्हटलं, “जे दोन पैसे कमवण्यासाठी इथे आले आहेत, त्या गोरगरीब बाहेरून आलेल्या हिंदू बांधवांना (Poor Migrant Hindus) मारू नका. त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवा. जय महाराष्ट्र!”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now