“हिंदू जगातील सर्वात सभ्य व सहीष्णू बहुसंख्याक, हिंदूस्थान कधीच अफगाणिस्तान होणार नाही”

मुंबई। बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार, कवी, पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या तालिबान आणि आरएसएसची तुलना करण्याच्या वक्तव्यावर आता अनेक लोक चांगलेच तापले आहेत. आरएसएसवरील वक्तव्यामुळे झालेल्या वादानंतर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात स्पष्टीकरण देत असताना जावेद अख्तर म्हणाले की, “मी जेव्हा 3 सप्टेंबर 2021 रोजी ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील.

एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे. मी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण सर्वप्रथम मला माझ्या उपरोल्लेखित मुलाखतीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे,” असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत, याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे आणि हे देखील ठामपणे बोललो आहे की, हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत. नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे.’असेही ते म्हणाले.

“तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत मला बरेच साम्य आढळते, याचादेखील माझ्या टीकाकारांना प्रचंड राग आला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्यात खरंच खूप साम्य आहे. मी येथे माझ्या या मतांचा पुनरुच्चार करतो आहे.

पुढे ते म्हणाले की, मला हिंदू उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना मी मुस्लिम समुदायातील प्रतिगामी चालीरीती आणि प्रथांच्या विरोधात उभा राहत नाही या खोटय़ा सबबीमागे लपू द्यायचे नाही. त्यांनी माझ्यावर हिंदू धर्माचा आणि हिंदूंचा अपमान केल्याचाही काहींनी आरोप केला आहे. यामध्ये एक कणभरही सत्य नाही,” असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
नीरज चोप्राने ज्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली 2 सुवर्ण जिंकली त्यांची हकालपट्टी का करण्यात आली? 
अभिनेता अजय देवगण सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडणार; बनवणार ‘बाहुबली’पेक्षा मोठ्या बजेटचा चित्रपट
केबीसीतील स्पर्धकाने शाहरुखची चांगलीच जिरवली, मिठी मारण्यास नकार देत अभिनयावरूनही झापले
या माणसामुळे लागला होता गुंड या शब्दाचा शोध, इंग्रजांच्या काळापासून प्रचलित आहे हा शब्द

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.