गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये वाद सुरु आहेत. यादरम्यान बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात हिंदू-मुस्लिम(Hindu-Muslim) एकतेचा अनुभव देणारी एक घटना समोर आली आहे. पाटोदा गावातील मुस्लिम बांधवाना रोजा सोडण्यासाठी हरिनाम सप्ताहामध्ये पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.(hindu people organize food for muslim people)
यावेळी एकाच मांडवाखाली हिंदू-मुस्लिम बांधवानी सहभोजन केले. या पंगतीत हिंदू बांधवांसाठी प्रसादाची तर मुस्लिम बांधवांसाठी रोजा सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पाटोदा गावातील या उपक्रमाची सध्या सर्वत्र खूप चर्चा होत आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी कमेंट करत सामाजिक सलोखा जपणाऱ्या गावकऱ्यांचे कौतुक केले आहे.
गेल्या २६ वर्षांपासून अंबाजोगाईजवळ असणाऱ्या पाटोदा गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत हा हरिनाम सप्ताह गावात पार पडतो. या हरिनाम सप्ताहामध्ये हिंदू-मुस्लिम बांधव आनंदाने सहभागी होतात. मुस्लिम बांधवांतर्फे या हरिनाम सप्ताहामध्ये नाश्त्याची सोय देखील केली जाते.
गावातील लोक एकत्र येत हा हरिनाम सप्ताह मोठया जल्लोषात साजरा करतात. पण गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही शहरांमध्ये या मुद्द्यावरून वाद देखील झाले होते. यादरम्यान पाटोदा गावातील लोकांनी एकत्र येत मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन केले.
गावकऱ्यांच्या या उपक्रमामुळे धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांना सणसणीत चपराक बसली आहे. मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन करून गावकऱ्यांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. राजस्थानमध्ये देखील अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. मुस्लिम बांधवाना रोजा सोडता यावा म्हणून एका हिंदू मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते.
यावेळी मंदिराच्या परिसरात बसून मुस्लिम बांधवानी रोजा सोडला होता. ही घटना अहमदाबादजवळ असणाऱ्या बनासकांठा जिल्ह्यामधील दलवाना या खेड्यात घडली होती. दलवाना गावातील १०० मुस्लिम बांधवाना रोजा सोडण्यासाठी हिंदू मंदिरात निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बाराशे वर्ष जुन्या वरंडा वीर महाराज मंदिराचा परिसर पहिल्यांदाच खुला करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :-
भाजपला घाम फोडण्यासाठी विरोधकांनी आखली नवी योजना, राष्ट्रपती पद हातातून जाणार?
अमित शहा इन ऍक्शन मोड! हिंसा करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, दिले ‘हे’ आदेश
बाळासाहेबांवर प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा, राज्याची बदनामी करू नका- सुप्रिया सुळे