Share

‘काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय ही तर भाजपाची चूक’, हिंदू महासंघाने भाजपला सुनावले

Anand-dave-pm-modi

सध्या ‘द कश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. राजकीय पक्ष देखील या चित्रपटाबाबत भूमिका घेऊ लागले आहेत. काही राजकीय पक्ष या चित्रपटाच्या समर्थनात आहेत, तर काही राजकीय पक्ष विरोधात आहेत.(hindu mahasangh statement on bjp)

हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया भाजप(BJP) नेत्यांनी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये, असे हिंदू महासंघाने(Hindu Mahasangh) भाजपाला सुनावले आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी या द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून भाजपाला फटकारले आहे.

यावेळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, “अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ५ वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षांच्या काळात भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केलं?”, असा प्रश्न आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. “भाजपवाल्यांनो खोटं-खोटं रडू नका. हिंदुत्व हिताचं उसण अवसान आणू नका”, असे देखील हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले आहेत.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी या चित्रपटावरून भाजपलाच सवाल केला आहे. “द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचे स्वागत करताय पण ही घटना घडली तेव्हा केंद्रात तुमचंच सरकार होतं. VP सिंग तुमच्याच पाठिंब्यावर पंतप्रधान होते. अतिरेक्यांना तुम्हीच परत सोडलं, तेही पैसे देऊन!”, असे आनंद दवे म्हणाले आहेत.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे पुढे म्हणाले की, “ज्या राज्यपालांच्या देखरेखीखाली हे हत्याकांड घडलं त्या जगमोहन यांना तुम्हीच राज्यपाल बनवलं, हे आम्ही विसरलो नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ५ वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षांच्या काळात भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केलं? काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय ही भाजपाची चूक आहे”, असा आरोप आनंद दवे यांनी केला आहे.

वकील असीम सरोदे यांनी देखील या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी फेसबुकवर या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये असीम सरोदे यांनी लिहिलं आहे की, “काश्मीर फाइल्स’ ही असत्यालाप करणारी आणखी एक फिल्म आहे. असत्याला सत्याचे कपडे घालण्याचे प्रकार वाढले आहेत”, असे असीम सरोदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
‘द काश्मीर फाईल्स’ प्रदर्शित न केल्यास आग लावू म्हणत हिंदू परीषदेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाला…
‘द काश्मीर फाईल्स प्रदर्शीत न केल्यास चित्रपटगृहाला आग लावू; हिंदू परिषदेची थेट धमकी
शेतकऱ्यांच्या वीजतोडणीला स्थगिती; ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now