सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. राजकीय पक्ष देखील या चित्रपटाबाबत भूमिका घेऊ लागले आहेत. काही राजकीय पक्ष या चित्रपटाच्या समर्थनात आहेत, तर काही राजकीय पक्ष विरोधात आहेत.(hindu mahasangh anand dave on bjp)
हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये, असे हिंदू महासंघाने भाजपाला सुनावले आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी या द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून भाजपाला फटकारले आहे.
यावेळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, “अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ५ वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षांच्या काळात भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केलं?”, असा प्रश्न आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. “भाजपवाल्यांनो खोटं-खोटं रडू नका. हिंदुत्व हिताचं उसण अवसान आणू नका”, असे देखील हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले आहेत.
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी या चित्रपटावरून भाजपलाच सवाल केला आहे. “द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचे स्वागत करताय पण ही घटना घडली तेव्हा केंद्रात तुमचंच सरकार होतं. VP सिंग तुमच्याच पाठिंब्यावर पंतप्रधान होते. अतिरेक्यांना तुम्हीच परत सोडलं, तेही पैसे देऊन!”, असे आनंद दवे म्हणाले आहेत.
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे पुढे म्हणाले की, “ज्या राज्यपालांच्या देखरेखीखाली हे हत्याकांड घडलं त्या जगमोहन यांना तुम्हीच राज्यपाल बनवलं, हे आम्ही विसरलो नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ५ वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षांच्या काळात भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केलं? काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय ही भाजपाची चूक आहे”, असा आरोप आनंद दवे यांनी केला आहे.
वकील असीम सरोदे यांनी देखील या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी फेसबुकवर या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये असीम सरोदे यांनी लिहिलं आहे की, “काश्मीर फाइल्स’ ही असत्यालाप करणारी आणखी एक फिल्म आहे. असत्याला सत्याचे कपडे घालण्याचे प्रकार वाढले आहेत”, असे असीम सरोदे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
ज्याला वाटत असेल चित्रपट चांगला नाही त्याने..’, द काश्मिर फाईल्सचा विरोध करणाऱ्यांवर बरसले मोदी
हनिमूनच्या रात्री पत्नीने केले भयानक कृत्य, घाबरलेल्या नवऱ्याने गाठले पोलीस स्टेशन; वाचा नेमकं काय घडलं
‘द काश्मीर फाइल्स’मुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणायचा प्रयत्न; दिलीप-वळसे पाटलांनी व्यक्त केली चिंता