पबमध्ये सुरू असलेला फॅशन शो हिंदूत्ववाद्यांनी गोंधळ घालून बंद पाडला; म्हणाले हा तर लव्ह जिहाद

मध्य प्रदेशच्या इंदोरमधून एक विचित्रच प्रकार घडला आहे. इंदोरमधल्या एका पबमध्ये अश्लीलता दाखवली जात असल्याचे सांगत हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांची एकच गोंधळ घातला आहे.

एका पबमध्ये आयोजित फॅशन शो हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी बंद केला. त्यामुळे मॉडेल्सना घाईघाईने पबच्या मागून बाहेर काढावे लागले. हिंदू संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पबमध्ये अश्लीलता दाखवली जात आहे. तसेच लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे.

त्याच्या तक्रारीवरून विजयनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आयोजकांना पोलीस ठाण्यात आणले. इथेही हिंदू संघटनांनी गोंधळ घातला आहे. पोलिसांनी फॅशन शो आयोजित करणारे फैज अहमद गौरी, कोरिओग्राफर आदित्य कोतवाल, डिझायनर अरबाज खान, मेक-अप मॅन आणि पब मालक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

फैज अहमद गौरी यांनी बुधवारी रात्री ९ वाजता शहरातील विजयनगरमधील शो-शॉ पबमध्ये हाय हिल्स नावाच्या फॅशन शोचे आयोजन केले होते. शो सुरू होण्यापूर्वीच सुमित हरडिया, सोनू कल्याणे आणि हिंदू जागरण मंचशी संबंधित इतर लोक येथे पोहोचले आणि त्यांनी यावेळी प्रचंड गोंधळ घातला.

पबमध्ये उपस्थित असलेल्या तरुण -तरुणींना मागच्या दरबाज्यातून पळून जावे लागले. खुप गोंधळानंतर टीआय तहजीब काझी येथे पोहोचले. कारवाईबाबत बोलताना त्यांनी आयोजकाला पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले.

हिंदूवादी संघटनेच्या लोकांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी येथेही गोंधळ घातला. पबमध्ये असे कार्यक्रम आयोजित करून हिंदू संस्कृती नष्ट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पबमध्ये अश्लीलता दाखवणे आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. येथे पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याचे आश्वासन देऊन प्रकरण शांत केले.

टीआय तेहजीब काझी यांनी सांगितले की या प्रकरणी शोचे कोरिओग्राफर आदित्य कोतवाल, डिझायनर अरबाज खान, फोटोग्राफर फैज अहमद घोरी, मॅनेजर लॉरेन्स, पब मालक भूपेंद्र रघुवंशी आणि मेकअप मॅन कशिश यांच्यावर कलम १८१ आणि १५१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशात अडीच कोटी लोकांच्या लसीकरणानंतर काॅंग्रेसचा ताप वाढला; मोदींचा हल्लाबोल
राम-लखन चित्रपटातील या अभिनेत्रीने पार्टीमध्ये कापून घेतली होती हाताची नस, किस्सा वाचून धक्का बसेल
चहासोबत खारी टोस्ट खाताय तर पाहा हा व्हिडिओ; पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.