शिवजयंतीचे औचित्य साधून धर्माच्या भिंती ओलांडत एका मुस्लिम मुलीचा आणि एका हिंदू मुलाचा विवाह सोहळा पार पडला आहे. २० फेब्रुवारी २०२२ रोजी पुण्यातील(Pune) नऱ्हेगाव येथे हा विवाह(marriage) सोहळा झाला आहे. या विवाह सोहळयाला असंख्य लोक उपस्थित होते. या सोहळ्यामुळे आंतरधर्मीय विवाहाचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.(hindu boy muslim girl married on shivjayanti)
अल्फीया जमादार या मुस्लिम तरुणीने अक्षय राऊत या हिंदू तरुणासोबत लग्न केले आहे. शिवजयंतीच्या दिवशी पुण्यातील नऱ्हेगाव येथे शिवभक्तांच्या उपस्थित आंतरधर्मीय विवाह सोहळा पार पडला आहे. यावेळी उपस्थित लोकांनी नववधू आणि वराला आशीर्वाद दिले. अल्फीया जमादार आणि अक्षय राऊत यांनी प्रेम विवाह केला आहे.
अल्फीयासाठी हा धाडसी निर्णय घेणं सोपं नव्हतं. अल्फीयाच्या कुटुंबियांकडून या लग्नाला तीव्र विरोध होता. अल्फीयाच्या वडिलांनी लग्न सोहळ्यात येऊन तिला आणि अक्षयला मारहाण केली. या मारहाणीत अल्फीयाच्या नाकाला आणि तोंडाला जखम झाली. त्यानंतर नवरदेवाला देखील अल्फीयाच्या वडिलांनी मारहाण केली.
यावेळी नववधू अल्फीया जमादार हीने आंतरधर्मीय विवाह सोहळ्यावरती आपले मत व्यक्त केलं आहे. अल्फीया म्हणाली की, “मी एका मुस्लिम समाजात जन्म घेतला. मी जुन्नर तालुक्यातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक इतिहास मी बघत आलेली आहे. त्यामुळे हिंदू धर्माबद्दल मला आकर्षण आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे आणि संविधानात आपण सगळे एक आहोत, असे सांगितलं आहे.”
अल्फीया जमादार हीने मुलींच्या अधिकारांवर देखील भाष्य केलं आहे. अल्फीया म्हणाली की, “मला माझा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिची आवड-निवड महत्वाची असते. आपला जोडीदार साथ देणारा हवा आणि समजून घेणारा देखील हवा, म्ह्णून मी प्रेम विवाह केला आहे”, असे तिने सांगितले.
अल्फीयाच्या वडिलांनी मारहाण केल्यानंतर तिने महिला आयोगांकडून सरंक्षण मागितले आहे. आमच्या जीवाला धोका आहे, असे अल्फीया जमादार हीने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये एका हिंदू मुलाने एका मुस्लिम मुलीशी लग्न केले होते. या विवाहानंतर मुलाच्या आणि मुलीच्या कुटुंबियांकडून दोघांना धमक्या देखील आल्या होत्या. पण तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
महत्वाच्या बातम्या :-
चित्रपटाची कथा लिहीण्यासाठी लेखकाने केले गुन्हे, सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हादरले
नवाब मलिकांनंतर ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी धरला भारतीयाचा हात, दलीप सिंग यांना सोपवली मोठी जबाबदारी