Share

अवघ्या ३ महिन्यांचा संसार, लग्नाचा अल्बमही नव्हता आला; हिंदू बँक मॅनेजरच्या पत्नीने फोडला हंबरडा

जम्मू काश्मीरमध्ये काल दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी एका मजुराची देखील हत्या केली होती. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे हिंदू भयभीत झाले आहेत आणि त्यांनी सामूहिक पलायन करण्याची घोषणा केली आहे. (hindu bank manger vijay kumar wife crying )

जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये विजय कुमार (Vijay Kumar) या बँक मॅनेजरची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. विजय कुमार यांच्या मृत्यूची बातमी समजताच हनुमानगढ या मूळगावी शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे विजय कुमार यांच्या पत्नीला आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. विजय कुमार यांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तीन महिन्यांपूर्वी विजय कुमार यांचे लग्न झाले होते. चार वर्षांपूर्वी विजय कुमार यांना नोकरी मिळाली होती. काही दिवसांपूर्वी विजय कुमार यांची जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बदली झाली होती. जुलै महिन्यात १० ते १५ दिवस घरी येण्याचे आश्वासन विजयकुमार यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले होते.

विजय कुमार यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या वडिलांना आणि आईला मानसिक धक्का बसला आहे. “माझं विजयशी बोलणं झालं होतं. त्याने मला जुलै महिन्यात १० ते १५ दिवस घरी येतो, असे सांगितले होते. त्याने राजस्थानात राहावे अशी आमची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते”, असे विजय कुमार यांच्या वडिलांनी सांगितले.

विजय कुमार यांच्या वडिलांनी पुढे सांगितले की, “विजयचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या लग्नाचा अल्बम देखील आला नव्हता. नोकरी लागल्यानंतर तीन वर्षे तो एकटाच राहत होता. लग्न झाल्यानंतर त्याला सुख मिळेल असं आम्हाला वाटलं. पण सगळं चुकीचं घडलं आहे. माझ्या मुलाला वैवाहिक सुखही उपभोगता आलं नाही”, असे म्हणत विजय कुमार यांचे वडील भावुक झाले.

“लग्न झाल्यानंतर त्याची कुलगाम जिल्ह्यात बदली झाली होती. मी त्याला घरी परत येण्यास सांगितले. पण त्याने मला नकार दिला. कुटुंबाची जबाबदारी घेत तो नोकरीसाठी कुलगाममध्ये गेला होता. तो जुलै महिन्यात घरी येणार होता. पण त्यापूर्वीच असं घडलं आहे”, असे विजय कुमार यांच्या आईने सांगितले. यावेळी आईने हंबरडा फोडत आक्रोश केला.

महत्वाच्या बातम्या :-
मोठा खुलासा, केकेच्या ह्रदयाभोवती तयार झाला होता फॅटी लेअर, शरीरात सापडली १० प्रकराची औषधं
एकनिष्ठ कार्यकर्ता! आपल्या नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी मिळावी म्हणून लिहिलं रक्ताने पत्र; राज्यात चर्चा
धक्क्यावर धक्के! हार्दिक पटेलची फोडाफोडीला सुरवात, ‘या’ बड्या काँग्रेस नेत्याला आणले भाजपमध्ये

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now