नही बताती दाम है, हमे तो चूसना आम है! पहिलीच्या या कवितेमुळे सोशल मिडीयावर वाद

एनसीईआरटी पुस्तकांमधील जून्या कवितांमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. आम की कटोरी असे त्या कवितेचे नाव आहे. सोशल मिडीयावरील नेटकरी ही कविता अश्लील असल्याचे बोलत आहेत. त्यातील भाषा अश्लील असल्याचे बोलत आहेत.

अनेक युजर्स ही कविता वाचल्यानंतर एनसीईआरटीला ट्रोल करत आहेत. लोकांच्या म्हणणे आहे की, कवितेला लहान मुलांच्या मानसिकतेने पाहिले पाहिजे म्हणजे कवितेचा कोणताही वाईट अर्थ निघणार नाही.

या कवितेत वाईट अर्थ काढणाऱ्यांच्या विचारांमध्ये खोट असल्याची टीकाही काही लोकांनी केली आहे. ज्या कवितेवरून वाद सुरू आहे ही २००५ पासून हिंदीच्या पाठ्यपुस्तकात आहे. ही कविता मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एनसीईआरटीने उत्तर दिले आहे.

एनसीईआरटीचे म्हणणे आहे की, स्थानिक भाषांमध्ये ही कविता लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना त्याची आवड निर्माण होईल. जानकरांचे म्हणणे आहे की, नवीन शिक्षण धोरण २०२० च्या अनुसार पुस्तकांमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत.

अशातच अशा छोट्या छोट्या गोष्टींना उचलून धरले जात आहे. त्या कवितेत छह सालकी छोकरी अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. नही बताती दाम है, हमे तो चूसना आम है.. अशा वाक्यांवर देखली सोशल मिडीयावर आक्षेप घेण्यात आला आहे.

एका वरिष्ठ समिक्षकाने म्हटले आहे की कवितेत मुलीच्या प्रतिमेला नकारात्मक पद्धतीने मांडण्यात आले आहे. त्यामुळे मुलगी आणि मुलामध्ये समानतेचा भाव प्रकट होत नाही. दुसऱ्या एका बाल साहित्यकाराने म्हटले आहे की ही कविता मुलांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने पाहायला हवी.

आपल्याला बालमनोविज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. तर काही जण म्हणत आहेत की ही दर्जाहीन कविता असून हिला अभ्यासक्रमातून वगळले पाहिजे. ही कविता कृष्णदेव शर्मा यांनी लिहीली आहे. ते बालसाहित्यकार आहेत. ते उत्तराखंडमध्ये बाल पत्रिकासुद्धा काढतात.

महत्वाच्या बातम्या
जुही चावलाने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘तेव्हा’ मी सलमानला रिजेक्ट केले होते
४० दिवसानंतर पण उद्धव ठाकरेंची खुर्ची स्थिर; आचार्य भोसलेंची भविष्यवाणी विरली हवेतच
VIDEO: सुई पाहून तरुणी चांगली घाबरली; आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरत तिला दिली लस
कोरोना झाला तरी चालेल पण लस नको, लसीकरणाला घाबरून गावकऱ्यांनी टाकल्या नदीत उड्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.