ज्या नेत्याने राहुल गांधीच्या कुत्र्यामुळे सोडली होती काँग्रेस, त्याच नेत्याला भाजपने बनवले मुख्यमंत्री

काँग्रेसला रामराम ठोकलेले हिमंत बिस्वा शर्मा हे आता आसामचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली होती आणि भाजपशी हातमिळवणी केली होती. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत आसाममध्ये भाजपने दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

आसामचे सध्याचे असलेले मुख्यमंत्री धुरा सर्बानंद सोनोवाल यांनी ५ वर्षे आसामचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. केंद्रिय मंत्री असताना त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले होते. पण आता आसामचे मुख्यमंत्री बिस्वा शर्मा हे होणार आहेत.

हिमंत बिस्वा शर्मा यांनी सलग पाचव्यांदा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी जलुकबाडी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सलग पाच वेळा जलुकबाडीमधून निवडणूक जिंकणारे हिमंत बिस्वा शर्मा कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.

त्यांनी २०१५ ला काँग्रेसला सोडचिट्ठी दिली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेस का सोडली याचा एक रंजक किस्सा आहे. जेव्हा त्यांना विचारले गेले की तुम्ही काँग्रेस का सोडली? तेव्हा ते म्हणाले की, जेव्हा मी राहुल गांधींना भेटायला गेलो होते तेव्हा त्यांचे लक्ष माझ्यापेक्षा त्यांच्या कुत्र्याकडे जास्त होते.

त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्षही दिले नाही. ते पाळीव कुत्र्याला बिस्कुट खाऊ घालत होते. असा आरोप करत त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली होती. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अनेक पदे सांभाळली आहेत. जसे की शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृषी, योजना आणि विकास, पीडब्लूडी आणि अर्थ या विभागाची मंत्री पदे त्यांनी सांभाळली आहेत.

त्यांचा माजी मुख्यमंत्री तरूण गोगाई यांच्यासोबतही वाद झाला होता. २०१६ च्या निवडणूकीच्या तोंडावर माझी मुख्यमंत्री तरूण गोगाई यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. या वादानंतर त्यांनी राहुल गांधीची भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता.

महत्वाच्या बातम्या
‘अण्णा नाईक’ यांच्या खऱ्या पत्नीला पाहिलेत का? पहा फोटो
धक्कादायक! नर्स म्हणाली तुम्ही काही दिवसांच्या सोबती, दुसऱ्याच दिवशी रूग्णाचा मृत्यु; पाहा व्हिडीओ
अनघाच्या साखरपुड्यात ईशा, यश आणि गौरीची धमाल मस्ती; पहा फोटो
लॉकडाऊनमध्ये गुपचूप सुरू होती लग्नाची खरेदी, दुकानाचे शटर उघडून पोलिसांनी बडवलं, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.