मुस्लिमांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले, तरच सामाजिक समस्यांवर तोडगा निघेल- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे देशभरात खळबळ माजली असून पुन्हा एकादा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला बिस्वा यांनी मुस्लिमांना दिला आहे.

जमिनीवरील अतिक्रमाणासारख्या सामाजिक संकटावर तोडगा काढायचा असेल तर स्थलांतरीत मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचे पालन करुन लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल, असे हिमंता बिस्वा यांनी म्हटले आहे.

तसेच जर लोकसंख्येचा विस्फोट असाच जर सुरु राहिला, तर एकेदिवशी कामाख्या मंदीराच्या जमिनीवरही कब्जा होईल. एवढंच काय तर माझ्या घरावरही अतिक्रमण होईल, अशी चिंता मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी व्यक्त केली आहे.

हिमंता बिस्वा यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाचा एक महिना पुर्ण झाला आहे. त्याच पार्श्वभुमीवर गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विरोधी अभियांनाचा उल्लेख केला आहे.

आसामच्या मध्य आणि खालच्या भागामध्ये राहणारे बंगाली भाषिक मुस्लिम हे बांग्लादेशमधून आलेले स्थलांतरीत असल्याचे मानले जाते. गेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपने आसाममधील मुळ समुदायांना त्यांच्यापासून वाचवण्याची गरज असल्याची वातावरणनिर्मिती केली होती.

आम्ही गेल्या विधानसभा अधिवेशनात लोकसंख्येबाबातचे धोरण लागू केलेले आहे. आम्ही खासकरुन अल्पसंख्याक मुस्लिम सुदायासोबत मिळून काम करण्यास इच्छुक आहोत. ज्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा बोजा कमी करत येईल, असे हेमंता बिस्वा यांनी म्हटले आहे.

तसेच लोकसंख्येचा विस्फोट हा गरीबी आणि अतिक्रमणासारख्या सामाजिक कृप्रथांचे मुळ आहे. जंगल, मंदीरे या ठिकाणांवर अतिक्रमाणाची परवानगी देता येणार नाही. हे सर्व वाढत्या लोकसंख्येमुळे होत आहे. जर आपण लोकसंख्या नियंत्रित केले तर सामाजिक समस्यांवर तोडगा काढता येईल, असे हिमंता बिस्वा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाबो! नवरदेव नवरीच्या हाताने मिठाई खाताना करत होता नाटकं; संतापलेल्या नवरीने पहा मग काय केले
रेमो डिसोजाने सांगितली आठवण, म्हणाला, सुशांतच्या ‘या’ आठवणीने आजही अंगावर शहारे येतात
VIDEO, काय म्हणावं या पोराला! मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.