हिमालया फार्मास्युटिकल कंपनी त्यांच्या प्रॉडक्टसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता हिमालया फार्मास्युटिकल कंपनी एका वादात सापडली आहे. सध्या सोशल मीडियावर हिमालया कंपनीबाबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हिमालया फार्मास्युटिकल कंपनी त्यांच्या हर्बल, केमिकल(Chemical) आणि फूड कलर उत्पादनांमध्ये हलालचा वापर करते, असा दावा करण्यात आला आहे.(himalaya company conterversy viral photo)
त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. ट्विटरवर सध्या बॉयकॉट हिमालया हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हिमालया कंपनीच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी सोशल मीडियावर केली आहे. हिमालया फार्मास्युटिकल कंपनी मुस्लिम ग्राहक आकर्षित करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांमध्ये हलालचा वापर करत आहे, असे त्या फोटोमध्ये म्हंटल आहे.
तसेच हिमालया फार्मास्युटिकल कंपनी इस्लामिक कायद्यांचे पालन करते, असे देखील त्या व्हायरल फोटोमध्ये म्हंटल आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कंपनीचा निषेध केला आहे. अनेकांनी ट्विट करत या कंपनीवर बंदीची मागणी केली आहे. एका व्यक्तीने ट्विट करत म्हंटल आहे की, “जो पर्यंत या फोटोवर कंपनी स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत आम्ही ट्विटरवर बॉयकॉट हिमालया ही मोहीम राबवू.”
मागील वर्षी जून महिन्यात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. हिमालया कंपनी त्यांच्या उत्पादनांमध्ये हलाल मांसचा वापर करते, असे या पोस्टमध्ये म्हंटले होते. कंपनीच्या निम, तुलसी आणि लसूणा या सप्लिमेंट्समध्ये हलालचा वापर करण्यात येतो, अशी माहिती त्या पोस्टमध्ये देण्यात आली होती.
Please tell me this is fake news @HimalayaIndia. My whole family loves Himalaya Products. pic.twitter.com/MxIx80BMtV
— Atul Kumar Mishra (@TheAtulMishra) March 30, 2022
इस्लामिक राष्ट्रांमध्ये सरकरांकडून हलाल प्रमाणपत्र जारी करण्यात येते. कोणतीही वस्तू किंवा अन्न पदार्थ मुस्लिमांसाठी योग्य आहे, हे सांगण्याकरिता हलाल प्रमाणपत्र जारी करण्यात येते. भारतातील अनेक खाजगी कंपन्याही हलाल प्रमाणपत्र देतात. यादरम्यान बाबा रामदेव यांचे पतंजलीचे उत्पादन हलाल प्रमाणित असल्याचे वक्तव्य व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोवरून लक्षात येते की जमियत उलामा-ए-हिंद या मुस्लिम संघटनेने पतंजलीच्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र जारी केले आहे. जमियत उलामा-ए-हिंद ही भारतातील प्रमुख इस्लामिक संघटनांपैकी एक आहे. लोकांनी या व्हायरल फोटोवर देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘पतंजली आणि हिमालयाच्या उत्पादनांवर बहिष्कार टाका’, असे एक नेटकऱ्याने ट्विटरवर लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
गॅस सिलींडरचा पुन्हा भडका! तब्बल एवढ्या रुपयांनी वाढले भाव, सामान्यांच्या खिशावर ताण
उत्तर कोरियात देश सोडणाऱ्यांना समजतात देशद्रोही, महिलांसोबत केले जाते ‘हे’ भयानक कृत्य
स्टॉक छोटा फायदा मोठा! २ रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना होणार २०० टक्के फायदा, पडणार पैशाचा पाऊस