घटस्फोटाशी संबंधित एका खटल्याचा निकाल देत असताना केरळ उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. पतीने आक्षेप घेतल्यानंतर देखील पत्नी दुसऱ्या पुरुषाशी रात्री उशिरापर्यंत बोलते हा कौटुंबिक छळ आहे, असे न्यायालयाने सांगितले. या खटल्यात केरळ उच्च न्यायालयाने जोडप्याला घटस्फोटाची परवानगी दिली आहे.(highcourt big statement on husband-wife case)
पत्नी रात्री उशिरापर्यंत तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवर बोलायची. यावर तिच्या पटीने आक्षेप घेतला होता. त्यामुळे पती-पत्नींमध्ये अनेक वर्ष वाद सुरु होता. यानंतर पतीने पत्नीविरोधात व्यभिचार आणि कौटुंबिक छळाचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण कौटुंबिक न्यायालयाने पतीचा अर्ज फेटाळला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मे २००६ मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. हे जोडपे कुरुप्पमपाडी येथे राहत आहे. पत्नी थोडुपुझा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात हंगामी कर्मचारी म्हणून काम करते. पत्नी रात्री उशिरापर्यंत तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवर बोलायची. लग्नाआधीपासून पत्नीचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी अवैध संबंध होते, असा आरोप पतीने याचिकेत केला आहे.
न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान पत्नीचे ऑक्टोबर 2012 ते जुलै 2013 या कालावधीतील कॉल रेकॉर्ड देखील सादर करण्यात आले. “फोन करणे आवश्यक होते. कार्यालयाशी संबंधित कामासाठी काही वेळा फोन करण्यात आले होते”, असे पत्नीने न्यायालयाला सांगितले. वारंवार फोन केले जात होते आणि फोनची वेळ देखील सामान्य नव्हती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
पतीने उच्च न्यायालयात साक्ष देताना सांगितले की, “एकदा पत्नी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यातील अश्लील संभाषण मी ऐकले. यानंतर पत्नीला याबाबत मी जाब विचारला. त्यावर आपल्या शरीरावर अधिकाऱ्याचा जास्त हक्क आहे, असे पत्नीने सांगितले. यामुळे मला धक्का बसला.” या प्रकरणात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.
दुसऱ्या पुरुषाशी रात्री उशिरापर्यंत फोनवरून बोलणे पतीला आवडत नाही, हे पत्नीला माहित होते. तरी देखील पत्नीने फोनवर संभाषण सुरूच ठेवले. पतीने आक्षेप घेतल्यानंतर देखील पत्नी दुसऱ्या पुरुषाशी रात्री उशिरापर्यंत बोलते हा वैवाहिक क्रूरपणा आहे, असे निकाल देत असताना केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :-
‘हा’ टीव्ही अभिनेता बनणार नव्या युगाचा ‘शक्तिमान’? मुकेश खन्नांसोबत करतोय शूटिंग
‘या’ कारणामुळे भाजप निवडणूकीत मुस्लिमांना तिकीटे देत नाही; अमित शहा स्पष्टच बोलले…
प्रेमात शारीरीक संबंध बनवणे माझ्यासाठी…; दीपिका पदुकोणच्या खुलाश्याने सगळेच झाले हैराण