लोक म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) यापेक्षा वेगळं मत नोंदवलं आहे. काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी प्रतिक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. एका कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हे मत नोंदवलं आहे.(highcourt big statement on couple from navi mumbai)
नवी मुंबईमधील(Navi Mumbai) एका जोडप्यामध्ये वाद सुरु होता. ह्या जोडप्याचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. या जोडप्याला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. पत्नीने पतीच्या कुटूंबियांनी हुंडा मागितल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या विरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत आरोपी पतीचा अटकपूर्व जमीन मंजूर केला. “पतीला पोलिसांच्या ताब्यात ठेवूनही प्रश्न सुटणार नाही, म्हणून या प्रकरणात कोठडीची आवश्यकता नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करावे, असा आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने पतीला दिला आहे.
“पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, भांडणं होतातच, मात्र काही विवाहित जोडप्यांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे त्यांचे संसार तुटून ते विभक्त होतात, म्हणून काही लग्नांच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात” असं मत या प्रकरणाचा निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं. पतीने लग्नाच्या वेळी सोन्याच्या नाण्यांची मागणी केली होती.
पण लग्नाच्या वेळी मुलीच्या कुटूंबियांनी हुंडा देण्यास नकार दिला. या गोष्टीवरून सासरच्या मंडळींनी मुलीला त्रास देण्यास सुरवात केली. हुंड्यावरून पती पत्नीला वारंवार शिवीगाळ करू लागला. २०१९ मध्ये वाशीत घर खरेदी करण्यासाठी पत्नीने पतीला १३ लाख ५० हजार रुपये दिले होते. तरीसुद्धा पतीकडून सातत्याने पैशांची मागणी केली जात होती.
या त्रासाला कंटाळून पत्नीने पती विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर भारतीय दंड संहितेअंतर्गत 498 (अ) (पती आणि सासरच्यांकडून त्रास) हुंडा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर पतीने अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर निकाल देताना न्यायालयाने काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, असे मत व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या :-
“हिंदुस्तानी भाऊला सोशल मीडियावर प्रस्थापित करून त्याला फेमस करणारी कंपनी भाजप”
एकुलत्या एक मुलीचा गिझर मधून गॅस गळती झाल्याने मृत्यू; आईने फोडला हंबरडा
माशाने केली मगरीसोबत मोठी खेळी, असा घेतला मगरीचा जीव की पाहून बसेल धक्का; पहा व्हिडीओ