तुमच्या अधिकाऱ्यांवर खुनाचे खटले दाखल केले पाहिजे; हायकोर्टाची संतप्त प्रतिक्रीया

कोरोनाचा फैलाव फक्त देशभरातच नाही तर पुर्ण जगभर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती खुप चिंताजनक झाली आहे. अशा परिस्थिती देशात काही राज्यात विधानसभाच्या निवडणूका झाल्या आहे.

काही राज्यात झालेल्या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झाल्या, त्यावेळी अनेक लोक प्रचार सभाला उपस्थित होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन झालेले दिसून आले नाही. आता याच पार्श्भुमीवर मद्रास हायकोर्टाने सोमवारी भारतीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायधीश संजीव बॅनर्जी या सुनावणी दरम्यान अस्वस्थ झालेले दिसून आले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच झापले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे, असे म्हणत संजीव बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकीलांना फटकारले आहे.

तसेच तुमच्या अधिकाऱ्यांना खरं तर खुणाचे आरोप करुन खटले भरायला पाहिजे. निवडणूकीच्या प्रचारसभा घेत होतात, तेव्हा तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होतात का? असे म्हणत संजीव बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला झापले आहे.

मतमोजणीच्या दिवशी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन कसे केले जाणार आहे. याच्या नेमक्या नियोजनाची ब्लुप्रिंट सादर केली नाही. तर मतमोजणीला परवानगी दिली जाणार नाही, असाही इशारा यावेळी न्या. संजीव बॅनर्जी आणि न्या. सेंथिलकुमार राममुर्ती यांच्या विद्यापीठाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’
अखेर ती आनंदाची बातमी आलीच! ‘मे’च्या पहील्या आठवड्यातच महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार होणार
राजेश टोपेंचा व्हिडिओ चर्चेत, कर्तव्याला दिले प्राधान्य; गाडीतच केला अल्पोपहार अन् पुन्हा लागले कामाला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.