आर्यन खानने ड्रग्ज घेतलंच नाही; व्हाट्सॲप चॅटमध्ये कोणतेही षडयंत्र नाही; हायकोर्टाचे स्पष्टीकरण

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात २६ दिवसांच्या कोठडीत होता आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर २८ ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, शनिवारी आर्यनला मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेला जामीन आदेश सार्वजनिक करण्यात आला.

त्यामध्ये न्यायालयाने त्याला जामीन का दिला याचे कारण स्पष्ट केले आहे. जामीन आदेशासह न्यायालयाने १४ पानांचे आदेश देताना हे स्पष्ट केले आहे की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत.

न्यायमूर्ती नितीन सांबरे म्हणाले की, अरबाज मर्चंट आणि अन्य दोन सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्याविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट अंतर्गत कट रचल्याच्या गुन्ह्यासाठी कोणतेही प्रथमदर्शनी पुरावे नाहीत.

उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर आज उपलब्ध केलेल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, आर्यनच्या ताब्यातून कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाही, तर मर्चंट आणि धमेचा यांच्याकडून जप्त केलेले अंमली पदार्थांचे प्रमाण एनडीपीएस कायद्यांतर्गत खुप कमी आहे.

याचबरोबर, न्यायालयाने हेही निरीक्षण नोंदवले की आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा कट रचला जात असल्याचे दर्शविण्यासाठी काहीही आक्षेपार्ह नव्हते. मुंबई उच्च न्यायालयाने या आदेशात पुढे असेही म्हटले आहे की, अर्जदारांविरुद्ध कट रचल्याचा खटला सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून मूलभूत सामग्री उपस्थित असली पाहिजे आणि या बाबींबाबत न्यायालयाने संवेदनशील असणे आवश्यक आहे.

आर्यन आणि त्याचे मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा हे एकाच क्रूझवर होते म्हणून केवळ आरोपींविरुद्ध कलम २९ चा गुन्हा दाखल करण्याचे कारण असू शकत नाही. यासोबतच एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या सर्व आरोपींच्या कबुली जबाबावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण ते बंधनकारक नाही, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले होते.

महत्वाच्या बातम्या
डान्सर सपना चौधरीला होणार अटक! फसवणूक केल्याने प्रेक्षकांनी केला गुन्हा दाखल; वाचा पुर्ण प्रकरण
डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर चहलची पत्नी झाली भावूक, लांबलचक पोस्ट लिहित म्हणाली..
औरंगाबादमधून आर्मीमध्ये भरती होणारी पहिली महिली ठरली शिल्पा, गावकऱ्यांनी वाजत गाजत काढली मिरवणूक
किळसवाणे! ‘या’ प्रसिद्ध गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याच्या तोंडावर केली लघुशंका, नंतर म्हणाली..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.