देशात सध्या ताजमहालवरून नवा वाद निर्माण झाला आहे. नुकतीच ताजमहलाबाबत अलाहाबाद(Alahabaad) उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या माध्यमातून ताजमहलाचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती. ताजमहलातील २२ बंद खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.(high court slapped the petitioners)
या प्रकरणात आज लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे. “ताजमहाल कोणी बांधला, याची आधी नीट माहिती घ्या”, अशा शब्दांत लखनऊ उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले आहे. जनहित याचिकेचा दुरुपयोग करण्यावरून देखील याचिकाकर्त्याला फटकारले आहे.
आज ताजमहलाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याला सांगितले की, “जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी विद्यापीठात जाऊन विषयाचा अभ्यास करा. त्या विषयात पीएचडी करा आणि त्यानंतर न्यायालयात जा”, असा सल्ला लखनऊ खंडपीठाने याचिकाकर्त्याला दिला आहे.
तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्याला पुढे सांगितले की, “तुम्हाला संशोधन करण्यापासून कोणी रोखलं तर तुम्ही त्याविरोधात न्यायालयात जाऊ शकता. तो अधिकार तुमच्याकडे आहे. पण इतिहास तुम्हाला वाटेल तसा सांगण्यात यावा, ही मागणी चुकीची आहे. कृपया जनहित याचिकेचा दुरुपयोग करू नका.”
उर्वरित सुनावणी दुपारी २ वाजल्यानंतर पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजप नेते रजनीश यांनी ताजमहलाबाबत लखनऊ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ब्रिटिश काळापासून बंद असलेल्या ताजमहलमधील या खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती, प्राचीन शिवलिंग आणि शिलालेख असू शकतात, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी जयपूर राजघराण्याच्या सदस्या आणि भाजप खासदार दिया कुमारी यांनी देखील एक दावा केला आहे. “ताजमहालच्या ठिकाणी जयपूर राजघराण्याचा महाल होता. कोणीतरी ताजमहालचे बंद दरवाजे उघडण्याचे आवाहन केले ही चांगली गोष्ट आहे. यामुळे सत्य बाहेर येईल”, असे भाजप खासदार दिया कुमारी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
अभिमानस्पद! एकेकाळी मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकणारी मुलगी पीएचडीसाठी पोहचली अमेरिकेत
IPL मध्ये मिळाले २.८० कोटी, तरी अंगावर घालायला कपडे नाही; खेळाडूने स्वत:च सांगितली आपबिती
राज्यसभा खासदारकीची निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मला पाठींबा द्यावा; संभाजीराजेंची मागणी