Share

Navratri : गरबा, दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकरची गरज नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

Garba

Navratri : गणेशोत्सव संपून नवरात्रीची सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली जात आहे. घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्रीमध्ये गरबा, दांडिया मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात डीजे लावण्यात येतो.

मात्र, आता उच्च न्यायालयाने नवरात्रीसंदर्भात एक निर्णय दिला आहे. नवरात्री हा धार्मिक सण असून यात देवीची पूजा केली जाते. पूजा करण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक असते. गोंधळाच्या वातावरणात पूजेत व्यत्यय येऊ शकतो.

त्यामुळे गरबा, दांडिया यासाठी डीजे, लाऊडस्पिकर यासारखी साउंड सिस्टीम वापरण्याची गरज नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. गोविंद सानप यांनी म्हटले की, जर पूजेत व्यत्यय येत असेल तर ही पूजा होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय दिला आहे.

नवरात्री हा धार्मिक सण आहे. जर डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे नवरात्रीच्या पूजेत व्यत्यय येत असेल, तर गरबा आणि दांडिया डीजे न लावता पारंपरिक पद्धतीनेही खेळला जाऊ शकतो, असेही यावेळी न्यायालयाने सांगितले आहे.

ध्वनी प्रदूषण नियम २००० अंतर्गत ‘सायलेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या खेळाच्या मैदानावर गरबा, दांडिया खेळला जातो. त्यामुळे तिथे डीजे सारखी साउंड सिस्टीम वापरण्यास मनाई करण्यात यावी, यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.

याच याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने नवरात्रीचे आणि पूजेचे महत्वही सांगितले आहे. तसेच जर नवरात्रीच्या पूजेत व्यत्यय येत असेल तर त्या पूजेला अर्थ नाही. त्यामुळे पूजेत व्यत्यय येणार नाही याची काळजी भक्तांनी घेतली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
Navratri : नवरात्रीच्या पहील्या दिवशी या पद्धतीनं करा घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी..
Pune : नवरात्री दरम्यान पुण्यात होतोय तीन दिवसांचा ‘सेक्स तंत्र’ कोर्स; काय आहे नेमका प्रकार? वाचा…
नवरात्रीदरम्यान मटणाची दुकानं बंद; सोनू निगमने केले आणखी एक वादग्रस्त विधान
भोंगावादावर गृहमंत्री वळसे पाटील स्पष्टच बोलले; भजनं, किर्तनं, नवरात्री, गणेशोत्सव, यात्रा सगळंच…

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now