‘हा’ लोकप्रियतेसाठी केलेला स्टंट, जयश्री यांची याचिका न्यायालयाने फेटाळली; देशमुखांना मोठा दिलासा

ऍड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, हा लोकप्रियतेसाठी केलेला एक स्टंट आहे असं निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. न्यायालयाने पाटील यांना झापले आहे. याचिकेत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

यावर न्यायालयाने त्यांना फटकारले आहे आणि या अशा याचिका स्वस्तातील लोकप्रियतेसाठी केल्या जातात असे निरिक्षण नोंदविले. न्यायमुर्ती एस. एस. शिंदे आणि मनिषा पिटाले यांनी ही सुनावणी केली. न्यायालयाने जयश्री पाटील यांना त्यांची भुमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते.

त्यानंतर ऍड. जनरल आशुतोष कुंभकोनी यांनी न्यायालयात हे स्पष्ट केलं होतं की, या प्रकरणात मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी आधीच मुख्य न्यायाधीशांसमोर याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

यावेळी ते असेही म्हणाले की पाटील यांनी चुकीची याचिका दाखल केलेली आहे. याआधीही जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ही तक्रार त्यांनी तेव्हा दाखल केली होती जेव्हा अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप झाला होता.

त्यांनी मागणी केली होती की, भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याच्या आगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक करण्यात यावी. त्यांनी तक्रारीमध्ये शरद पवारांचे नावही घेतले होते.

त्यांचे म्हणणे होते की यामध्ये मास्टरमाईंड अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे आहेत. तसेच त्यांनी असा गंभीर आरोपही लावला होता की अनिल देशमुख हे स्वताच गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाहीये.

दरम्यान पाटील यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिस यावर काय ऍक्शन घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण पाटील यांनी जरी तक्रार केली असली तरी अनिल देशमुख यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

महत्वाच्या बातम्या
रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीवर वळूचा हल्ला, वळूने १० फुट हवेत फेकलं आणि…, पहा व्हिडीओ
एसपीला वाचविण्यासाठी त्याने झेलले तलवारीचे वार, आयसीयुमध्ये मृत्युशी देतोय झुंज
कारच्या धडकेने रिक्षातील CNG चा भयानक स्फोट, ४ जण जागीच ठार; पहा भयानक व्हिडीओ
७० च्या दशकात जुहू बीचवर नग्न अवस्थेत पळाली होती ‘ही’ अभिनेत्री; नाव वाचून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.