मुंबई | शिवसेना आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत यांचा वाद शिगेला पोहोचला होता. कंगना वारंवार वादग्रस्त विधाने करत होती यामुळे शिवसेना आणि कंगना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत होते. महाराष्ट्र सरकारवर कंगणाने वारंवार वादग्रस्त वक्तव्ये केली होती. सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर हा वाद सुरू झाला होता.
याचदरम्यान, कंगणाचे मुंबईतील ऑफिस अनधिकृत म्हणत मुंबई महापालिकेने ऑफिसवर हातोडा मारला होता. मात्र ही कारवाई अवैध असल्याचे सांगत मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दणका दिला आहे.
कार्यालय तोडल्यानंतर कंगणाने हायकोर्टात या प्रकरणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती याचा निर्णय आज कोर्टाने दिला. कंगणाचा ऑफीसवर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई ही अवैध आहे असे कोर्टाने सांगितले आहे.
तसेच महापालिकेने कंगणाला दिलेली नोटीस अवैध आहे त्यामुळे महापालिकेला भरपाई द्यावी लागणार आहे. कंगणाच्या विनंतीचा विचार करून नुकसानीचे मूल्यमापन केले जाईल आणि नंतर त्याविषयी निर्णय दिला जाईल.
हा निर्णय शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने दिला आज दिला. तसेच मुंबई मनपाची कारवाई नागरिकांच्या हक्कांविरोधात आहे असंही मत न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे आता मुंबई महापालिकेला कंगणाला भरपाई द्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
८० तास टिकलेल्या सरकारच्या स्थापनेमागील सर्व सत्य आले समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
…हे मी बोललेच नाही, एबीपी माझाने तात्काळ माफी मागावी – पंकजा मुंडे