परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा नाही; उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल

लग्नानंतर झाले असातानाही काही पुरुष आणि महिला विवाहबाह्य संबंध ठेवत असतात. आता याच बाहेरील संबंधांवर न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. एखाद्या व्यक्तीचे लग्न झाले असेल आणि तरी त्याने जोडीदाराच्या परस्पर सहमतीने ठेवणे हा गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्यावेळी हे मत नोंदविण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारात सुरक्षा मागण्याचा अधिकारही असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

घटस्फोटासाठी अर्ज केलेला एक तरुण सध्या दुसऱ्या एका तरुणीसोबत राहत आहे. पण त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबापासून आपल्याला जीवाला धोका असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे. आता त्याला सुरक्षा पुरवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

दरम्यान, लग्न झालेली व्यक्ती जर आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशी लैंगिक संबंध ठेवत असेल तर अशा व्याकींना सुरक्षा देण्याची गरज नाही, असा निकाल याआधी अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता.

अलाहाबादच्या या निकालाचा संदर्भ पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दिला होता, पण त्या निकालाशी सहमत नसून सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड विधानाचं कमल ४९७ हे संवैधानिक असल्याचे म्हटल्याचा संदर्भ हायकोर्टाने दिला आहे.

एखाद्या व्यक्तीने परस्पर सहमतीने इतर व्यक्तींशी संबंध ठेवणे हा गुन्हा नसून अशा व्यक्तींच्या जीवाला धोका असेल, तर सुरक्षा पुरवणे योग्य आहे, असे हायकोर्टाने म्हटले आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर काही लोकांनी आक्षेपही घेतला आहे.

‘मुख्यमंत्री वाजत गाजत येणारच, हिंमत असेल तर रोखा’, शिवसेनेचे राणेंना खुले आव्हान
विमानतळ उद्घाटनासाठी ज्योतिरादित्य शिंदेंचा ठाकरेंना फोन; राणेंचा जाहीर अपमान करत जागा दाखवली
चीपी विमानतळावरून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात “सामना”!!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.