हे संजय! तुमच्या बाजूला बसलेल्या धृतराष्ट्रला सांगा, पुत्र मोहात ते इंद्रप्रस्थ गमावणार

दिल्ली | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केसमध्ये उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला. ही केस सीबीआयकडे देऊन सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे.

पाटणामधील दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा अशी मागणी एका याचिकेत रिया चक्रवर्ती हिने केली होती. या संबंधी सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने खटल्याच्या संबंधित फाईल्स सीबीआयकडे सोपवण्यास सांगितल्या आहेत.

सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि या केससंबंधी मदत केली पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले आहे. भविष्यात या केसमध्ये नोंदविण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकरणाविषयी चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, या निकालानंतर अनेक भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या विषयात बोलताना त्यांनी संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनीही संजय राऊत यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.

“कृष्ण ऊवाच: हे संजय: क्योंकि मैंने आपको दिव्य चक्षु प्रदान किया हैज़रा अपने समीप बैठे “धृतराष्ट्र” से कहिए की, पुत्र मोह में वे इंद्रप्रस्थ गवाने जा रहे है।” अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.