भारतीय क्रिकेट संघात असे काही खेळाडू आहेत की ज्यांना भरपूर संधी मिळतात पण त्यांना त्यांचा फायदा घेत नाहीत. राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान परागबद्दल असेच म्हणता येणार आहे, जो या फ्रँचायझीचा बराच काळ भाग राहिलेला आहे. राजस्थान रॉयल्सने रियान परागवर खूप विश्वास देखील दाखवला आहे.
राजस्थान रॉयल्सने रियान परागवर विश्वास दाखविल्याबद्दल मदनलाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रियान परागने फलंदाजीमध्ये त्याच्या फ्रँचायझीला परतावा दिला नाही. भारताचे माजी क्रिकेटपटू मदनलाल यांनीही रियान पराग याच्यावर टीका केली आहे.
आयपीएल २०२२ मध्येही रियान पराग काही विशेष करू शकला नाही. रियान परागने आयपीएल २०२२ मध्ये फक्त एकाच सामन्यात धावा करण्यात यशस्वी झाला होता. रियान परागला त्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. या सामन्यानंतर पराग इतर कोणत्याही सामन्यात स्वबळावर खेळताना दिसला नाही.
रियान परागने आयपीएल २०१९ मध्ये पदार्पण केले आहे. आयपीएलच्या आयपीएलच्या एका हंगामात तेव्हापासून २०० धावाही पार करण्यात अपयशी ठरला आहे. रियान परागची वृत्ती अप्रतिम आहे आणि रियान पराग आपल्या खेळकर हावभावांमुळे लक्ष वेधून घेत असला तरी बॅटिंगमध्ये येताच तो धडपडताना दिसतो आहे.
आयपीएल २०२२ मध्ये रियान परागने हंगामात १७ सामने खेळले आणि त्याच्या बॅटमधून १६.६४ च्या खराब सरासरीने केवळ १८३ धावा निघाल्या आहेत. २० वर्षीय फलंदाजाची सततची खराब कामगिरी राजस्थान रॉयल्सलाही पटवून देण्यात अपयशी ठरली आहे.
७१ वर्षीय मदनलाल यांनी म्हटलं आहे की, रियान पराग खेळ बदलू शकेल इतका मोठा खेळाडू नाही. आयपीएल फायनल संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराने देखील रियान पराग बद्दल वक्तव्य केलं आहे. परागकडे फिरकी आणि वेगवान गोलंदाजी खेळण्याची उत्तम क्षमता आहे, असा संगकाराचा ठाम विश्वास आहे.
महत्वाच्या बातम्या:-
सिद्धू मुसेवालाच्या कुत्र्यांनीही सोडले खाणेपिणे; मुक्या जीवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत अश्रू येतील
बडे अच्छे लगते है’फेम अभिनेता नकुल मेहताची तब्येत बिघडली; तातडीने केलं रूग्णालयात ॲडमीट
क्रिकेटपटू दीपक चहर अडकला लग्नबेडीत, लुक पाहून चाहते घायाळ; पहा लग्नातील सुंदर फोटो