Share

रविंद्र जडेजाला बाद केल्यानंतर हर्षल पटेलने केला जल्लोष, दोन वर्षांनंतर घेतला ‘असा’ बदला

IPL 2021 आणि IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (RCB) वेगवान गोलंदाज हर्षल पटेलसाठी (Harshal Patel) काय बदलले. 2021 च्या आयपीएलमध्ये पटेलच्या एका ओवरमध्ये 37 धावा ठोकणाऱ्या त्याच रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) यंदाच्या आयपीएलमध्ये पटेलने आऊट केले आणि त्याचा बदला पूर्ण केला. जडेजा बाद झाल्यानंतर पटेलचा उत्साह पाहण्यासारखा होता, कारण त्याचा बदला आणि स्वप्न दोन्ही पूर्ण झाले.( Hershal Patel took revenge after two years)

2021 च्या आयपीएलमध्ये पटेलविरुद्ध जडेजाने शानदार फलंदाजी केली होती. जडेजाने पटेलच्या चेंडूवर 6, 6, 6 (NB), 6, 2, 6, 4 चेंडूत 37 धावा केल्या. पण पटेलने कालच्या सामन्यात जडेजाची चाल पूर्ण होऊ दिली नाही. यावेळी हर्षलच्या चेंडूंसमोर जडेजा असहाय्य दिसत होता. पटेल चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकत होता. या सामन्यात जडेजा केवळ 5 चेंडू खेळू शकला आणि 3 धावा करून बाद झाला.

पटेलने यावेळी सीएसकेविरुद्ध जोरदार गोलंदाजी केली. त्याचे चेंडू असे सांगत होते की जणू तो गेल्या वर्षीचा स्मॅश विसरला नाही आणि यावेळी त्याने सीएसकेच्या फलंदाजांना रोखून धरले. पटेलने या सामन्यात 4 ओवरमध्ये 35 धावा देत 3 बळी घेतले. पटेलने मोईन अली (34), रवींद्र जडेजा (3), ड्वेन प्रिटोरियस (13) यांचे बळी घेतले.

या सामन्यात एका क्षणी CSK चांगल्या स्थितीत दिसत होते, पण पटेलने लागोपाठ ओवरमध्ये संघाला यश मिळवून देत समोरच्या संघाला परतवून लावले. आरसीबीने हा सामना 13 धावांनी जिंकला. जडेजाची विकेट घेतल्यानंतर पटेलने जल्लोष साजरा केला. पटेलला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले.

गेल्या 4-5 सामन्यांपासून कमी धावा देण्याचे आपले लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की तो चेंडूचा योग्य ठिकाणी टप्पा टाकत होता. शेवटच्या ओव्हर्समध्ये तो बाउन्सर, यॉर्कर्स आणि हार्ड लेन्थ बॉलचा वापर करून फलंदाजांना चकमा देण्याचा प्रयत्न करत होता.

महत्वाच्या बातम्या-
रियान पराग आणि हर्षल पटेलच्या वादात चुक कोणाची? सोशल मिडीयावर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
शेवटच्या बाॅलवर षटकार मारताच चिडला हर्षल पटेल; मैदानावरच रियान परागच्या अंगावर धावून गेला
मी जेव्हा तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा.., हर्षल पटेलची बहिणीसाठी भावूक पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
RCB चा जबरदस्त गोलंदाज हर्षल पटेल IPL सोडून परतला घरी, धक्कादायक कारण आले समोर

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now