हिरोची नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; एकदा चार्ज केल्यास तब्बल २१० किलोमीटर धावते, किंमत फक्त…

सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढत आहे. यामध्ये पेट्रोलचा बराचसा खर्च वाचतो आणि इलेक्ट्रिक गाड्यांची किंमतही आपल्या बजेटमध्ये असते त्यामुळे लोक आता इलेक्ट्रॉनिक गाड्या घेण्यावर भर देत आहेत. हिरोनेसुद्धा इलेक्ट्रॉनिक गाड्या बनवायला सुरुवात केली आहे.

हिरोची नवीन इलेक्ट्रिक Optima Nyx-hx लॉन्च केली आहे. कंपनीची ही स्कुटर new city speed सेगमेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये Optima-hx, Nyx-hx आणि Photon-hx हे मॉडेल्सदेखील सामील आहेत.

हिरोची ही स्कुटर विशेष म्हणजे B2B व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी सादर करण्यात आली आहे. नवीन Nyx-hx ही स्कुटर एका चार्जमध्ये २१० किलोमीटर धावते अशी माहिती कंपनीने दिली आहे.

ही स्कुटर वजन किंवा समान नेण्यासाठी उपयुक्त असून हिचे सीट ऍडजस्ट करता येते त्यामुळे उरलेली जागेचा वापर तुम्ही इतर कामांमध्ये त्याचा उपयोग करता येऊ शकतो. या स्कुटरमध्ये १.३४ किलोवॅटची बॅटरी बसवण्यात आली आहे.

कंपनीने हीरो इलेक्ट्रिक चार्ज करण्यासाठी देशभरात 500 चार्जिंग स्टेशन उभारले आहेत त्यामुळे स्कुटर चार्जिंग करण्यासाठी कसलाही त्रास होणार नाही. हिरोने या स्कुटरची एक्स शोरूम किंमत फक्त ६३ हजार ९९० ठेवली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.