दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल, वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा

मुंबई : कोरोनामुळे यंदा सुरक्षित अंतर, मास्कसह विविध कोरोनासंबंधीच्या उपाययोजना करून दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले.

बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. त्यासाठी, विद्यार्थ्यांची तयारीही सुरू झाली आहे. अशातच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.

करोना प्रादुर्भावामुळे यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले. त्यामुळे परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाची चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी, स्वयंअध्ययन करण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून नमुना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली होती.

त्यानुसार सरावास म्हणून विद्यार्थ्यांना प्रश्नसंचही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गायकवाड यांनी शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढ्यांचा वापर करण्यासाठी https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. विषय निहाय प्रश्नपेढ्या तयार होतील, तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

२००० रुपयांच्या नोटांबद्दल मोदी सरकारचा खुलासा, वाचा धक्कादायक माहिती

राज्यात ‘करोना’चा हाहाकार! राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे नियम

चाहत्यांना दिसला नेहा कक्करचा कातिलाना अंदाज; फोटो पाहून तुम्हीही व्हाल पागल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.