Urfi Javed : उर्फी जावेद अनेकदा तिच्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते. कधी ती अंगाला दगड गुंडाळून येते तर कधी पोत्यापासून बनलेला ड्रेस घालते. उर्फीचा फॅशन सेन्स असा आहे की कोणाचेही मन हेलावून जाईल. पण तीची बहीणही उर्फीला चांगलीच टक्कर देत आहे. सध्या उर्फी जावेदची बहीण डॉली जावेदचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. उर्फीची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे पण लोकप्रियतेच्या बाबतीत तिची बहीणही कमी नाही. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला सगळेच ओळखतात. आपल्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्राम आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर सतत व्हायरल होत आहेत.
पण तुम्ही उर्फी जावेदची धाकटी बहीण डॉली जावेद पाहिली आहे का? तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणे डॉली देखील बोल्डनेसच्या बाबतीत चाहत्यांमध्ये चर्चेत असते. नुकतेच डॉलीचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ताज्या फोटोंमध्ये उर्फी जावेदची बहीण डॉली जावेद रिव्हिलिंग ड्रेस घातलेली दिसत आहे.
रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून डॉली कॅमेऱ्यासमोर तिची किलर स्टाईल दाखवत आहे. डॉलीचा हा लूक खूपच बोल्ड दिसत आहे. चित्रात डॉली तपकिरी टॉपसह त्याच रंगाची पायघोळ घातलेली दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून एक गोष्ट स्पष्ट होते की उर्फी जावेदपेक्षा डॉली जावेदने तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायळ केले आहे.
डीप नेक टॉपमुळे डॉलीचा लूक आणखीनच बोल्ड झाला आहे. ही छायाचित्रे शेअर करताना डॉली जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फुलपाखरे जिवंत होतात जेव्हा ते तुमच्या शेजारी असतात.’ ज्यावर तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. डॉलीप्रमाणेच तिची दुसरी बहीण आसफी देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
डॉलीचे इन्स्टाग्रामवर 90 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. जे तीच्या बोल्ड फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. डॉलीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतात.
महत्वाच्या बातम्या
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….
rupali thombare : नाशिक पेठमध्ये विजय मिळवल्यानंतर रुपाली ठोंबरेंच्या झिरवळांना खास शुभेच्छा, म्हणाल्या, झाडी, डोंगर, हाटील…
Suryakumar yadav : ‘तो जगातील नंबर १ फलंदाज’, ऑस्ट्रेलियन खेळाडूने ‘या’ भारतीय फलंदाजाचे केले तोंडभरून कौतुक