पारंपारिक शेती सोडून केली ‘या’ भाज्यांची लागवड, आता करतोय लाखोंची कमाई

 

पारंपारिक शेती सोडून आजकाल अनेक शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसतात. आजची हि गोष्ट अशाच एका शेतकऱ्याची आहे, ज्याने पारंपारिक शेतीला सोडून शेतात एक नवीन प्रयोग केला आहे आणि त्यातुन तो लाखो रुपयांची कमाई करत आहे.

गोंदीया जिल्ह्यातील शेतकरी हेमराज श्रीराम पुस्तोडे हे नेहमीच शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांनी एक एकर शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नगदी पिकांची लागवड केली आहे. या पिकातून ते वर्षाला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

हेमराज पुस्तोडे यांच्याकडे वडिलोपार्जित दिड एकर शेती आहे. त्यांना या छोट्याशा जमिनितीच चांगले उत्पन्न मिळवायचे होते, त्यामुळे त्यांनी हा प्रयोग केला होता. त्यांना परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाते.

एका शासकिय योजनेतून त्यांनी आपल्या जमिनीवर विहिर खोदली. त्यामुळे त्यांना बाराही महिने पुरेसे असे पाणी होते. त्यानंतर त्यांनी अर्ध्या एकर शेतीत धानाची लागवड सुरु केली.

पुढे जेव्हा धानाच्या उत्पादन घेतल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी मका, मिरची आणि मुंगाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तंत्रज्ञानाचा पुर्ण वापर करत हि शेती केली आहे. ही शेती करताना त्यांची पत्नीही त्यांची साथ देत आहे.

उत्पादन खर्च कमी येण्यासाठी सेंद्रीय शेतीचा वापर केला पाहिजे. तसेच जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी फळभाज्या पिकांवर निंबोळी-दशपर्णी अर्क, जीवामृत वापरले पाहिजे असे हेमराज पुस्तोडे यांनी म्हटले आहे.

ही शेती करुन शेती करुन पुस्तोडे दाम्पत्याला चांगलाच नफा होत आहे, त्यात मक्यापासून ३८ हजार, मिरची २० हजार रुपयांचा नफा, तसेच चवळीच्या आणि भेंडीच्या लागवडीतून त्यांनी जुलै महिन्यापर्यंत चाळीस हजारांचे उत्पन्न घेतले होते. अशा प्रकारे हेमराज पुस्तोडे वर्षाला लाखोंची कमाई करत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.