फक्त दोन पदार्थ खाऊन आपल्या मुळव्याधाला कायमचे करा बाय बाय!

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत भयंकर आहे. हा त्रास वेदनादायी असला तरीही या आजाराबद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेकांमध्ये या त्रासाची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय मदत घेतली जाते. परंतु आज आम्ही असा उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचा मुळव्याध लगेच संपेल.

सुरुवातीला सामग्री पाहूयात. २ कप गाईचे दूध घ्यावे. त्यानंतर तुम्हाला २ किंवा ३ सुके अंजीर घ्यायचे आहे. सुके अंजीर तुम्ही धुवून घेऊ शकता जेणेकरून केमिकल असतील ते निघून जातील. तसेच साल काढलेले ५ बदाम घ्यावे. फक्त ऐवढेच सामान लागणार आहे. जे तुमच्या घरातही असेल.

त्यानंतर साल काढलेले ५ बदाम तुम्हाला किसून घ्यावे, किंवा मिक्सर मध्ये लावून सुद्धा बारीक करून घ्यावेत. पातेल्यात २ वाट्या दूध घ्या त्या दुधात बदामाचा वाटलेला किस टाका. नंतर त्यात सुक्या अंजिराचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आहेत. नंतर हे मिश्रण गॅस वर ठेवून चांगल्या प्रकारे उकळू द्यायचे आहे.

हे मिश्रण तुम्हाला ५ ते १० मिनिट उकळू द्यायचे आहे. उकळून झाल्यानंतर ते मिश्रण गॅस वरून काढून कोमट होऊ द्यायचे आहे. हे मिश्रण कोमट झाल्यावर पहिले अंजीर चावून खावे किंवा अंजीर व दूध एकत्र खाऊ शकता.

हा उपाय संध्याकाळी झोपण्यापूर्वी करू शकता किंवा सकाळी सुद्धा करू शकता. एक लक्षात ठेवा की ज्या व्यक्तींना शुगर आहे त्यांनी २ अंजीर ऐवजी १ अंजीर वापरवा आणि हा उपाय करावा. हा उपाय केल्याने तुमची मुळव्याधीपासून सुटका नक्की होईल.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! अखेर कोरोनामुळे आयपीएल रद्द, बीसीसीआयची माहिती
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी खाणे शरीरासाठी ठरतय घातक; वाचा तज्ञ काय म्हणतात..
‘जेवण नंतर करू, आधी देशासाठी ऑक्सिजन करायचाय’; खानेपिणे सोडून काम करताहेत कामगार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.