भाजपला धक्का! ‘या’ बड्या माजी आमदाराचा पक्षाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई | महापालिका निवडणुकीचे वारं वाहत असताना शिवसेनेने भाजपला आणखी एक जबर धक्का दिला आहे. पक्षनेतृत्वावर नाराज असणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज सायंकाळी भाजपाचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांचा भाजपाला रामराम ठोकला.

भारतीय जनता पार्टीला बोरीवलीत खिंडार पडले असून मेहता यांच्या प्रवेशाने शिवसेनेला बोरीवलीत अधिक मजबूती येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बोरिवली पश्चिममधून हेमेंद्र मेहता हे ३ वेळा आमदार होते. पण भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना विधानसभेला तिकीट देण्यात आलं. त्यावेळी हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी केली होती. पुढे मेहता यांनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा ते भाजपवासी झाले. आज अखेर त्यांनी पुन्हा भाजपला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून मुंबईमध्ये भाजपा पक्ष वाढीसाठी झटणारे, हेमेन्द्र मेहता सध्याच्या भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याचबरोबर पक्षात घुसमट होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘कोण कुठली रिहाना? का तिला इतकं महत्व दिलं जातय?’
‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा…; राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम
मानसी नाईकने पती प्रदीप रावांसाठी घेतला खास उखाणा; वाचून तुम्हाला वाटेल कौतुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.