पंतप्रधान मोदी फक्त मन की बात करतात, काम की बात नाही; मुख्यमंत्र्यांचा जबरदस्त टोला

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्ष मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. कोरोनाची परस्थिती सांभाळण्यास मोदी सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही केला जात आहे.

अशात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत आहे. असे असताना आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधानांशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे. अशा त्यांनी पंतप्रधानांवर टिकाही केली आहे. पंतप्रधान फक्त मन की बात करतात, पण काम की बात करत नाही, अशी टिका हेमंत सोरेन यांनी केली आहे. यासंदर्भात हेमंत सोरेन यांनी एक ट्विट केले आहे.

आदरणीय पंतप्रधानांसोबत फोनवरुन चर्चा झाली. पंतप्रधानांनी केवळ मन की बात केली. पंतप्रधानांनी मन की बात केली असती किंवा ऐकली असती, तर फार चांगले झाले असते, अशी टिका हेमंत सोरेन यांनी पंतप्रधानांवर केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आहे. त्यामध्ये झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगणा सारख्या वेगवेगळ्या राज्यांचा समावेश होता.

याआधी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवर टीका केली होती. पंतप्रधानांशी केलेली चर्चा केवळ वन-वे असते. आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही, अशी टिका मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना रुग्णांवर संत्र्याच्या बागेत उपचार; झाडाच्या फांद्यांना अडकवून देतोय सलाईन
कृष्णप्रकाश यांच्या वेशांतर करून मध्यरात्री पोलीस ठाण्यांना अचानक भेटी, बेजबाबदार पोलिसांना फुटला घाम
विहिरीतून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांचा भन्नाट जुगाड; पहा तुफान व्हायरल व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.