हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आहाना देओलने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. आहानाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ही बातमी चाहत्यांना दिली. ‘अॅस्ट्राइया आणि अदिया वोहरा या जुळ्या मुलींचं २६ नोव्हेंबर रोजी आमच्या घरात आगमन झालं’, असे तिने लिहिले होते.

अहाना आणि तिचा पती वैभव वोहरा यांनी जुळ्या मुलींची नावे अ‍ॅस्ट्रिया आणि आडिया असे ठेवले आहेत. नवीन पाहुण्यांच्या आगमनानंतर कुटुंबीयांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. अहानाला अद्याप रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

याचबरोबर स्वतः हेमा मालिनी यांनी देखील ही गोड बातमी चाहत्यांना माहिती दिली. याबद्दल हेमा मालिनी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमाने लिहिले की, ‘खूप आनंद होत आहे हे सांगताना की माझ्या लहान मुलीने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. मी पुन्हा एकदा दोन्ही पऱ्या अस्त्रिया आणि आदिया यांची आजी बनल्याने खूप आनंदी आहे.’

दरम्यान, आहाना – वैभव वोहरा यांचे २ फेब्रुवारी २०१४ रोजी विवाह झाला होता. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म जून २०१५ मध्ये झाला होता. आहाना – वैभव वोहरा यांनी आपल्या मुलाचे नाव डरेन वोहरा असे ठेवले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन
साराचा कि.सींग सिन पाहून वडील सैफ अली खानने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाला…
छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार डॉ. अमोल कोल्हे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.