बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करुन हेमा मालिनीने फेडले होते कर्ज; जाणून घ्या पुर्ण प्रकरण

बॉलीवूड कलाकार आणि इनकम टॅक्स विभागामध्ये नेहमीच वाद होत असतात. त्यामूळे कलाकार इनकम टॅक्सच्या वादात न अडकण्याचा प्रयत्न करत असतात. इनकम टॅक्समूळे ड्रीम गर्ल हेमा मालिनीला बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले होते.

धर्मेंद्रशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी अभिनय क्षेत्रापासून दुर गेल्या होत्या. त्यांनी मुलगी इशा देओलला जन्म दिला होता. इशाच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांनी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळत नव्हते.

याच कालावधी त्यांना इनकम टॅक्स विभागातून फोन आला आणि त्यांना एक करोडचा दंड भरण्यास सांगण्यात आले. हे ऐकून हेमा मालिनीला धक्क बसला. कारण त्यांच्याकडे एवढा पैसा नव्हता आणि त्यांना धर्मेंद्रकडून पैसे घ्यायचे नव्हते.

अशा परिस्थितीमध्ये त्यांना काम करणे हाच एक मार्ग राहिला होता. त्यांनी अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांना कोणीही चित्रपटामध्ये घ्यायला तयार नव्हते. त्यांनी खुप प्रयत्न केले पण त्यांना काम मिळत नव्हते.

याच कालावधीमध्ये त्यांना एका बी ग्रेड चित्रपटाची ऑफर आली. बी ग्रेड चित्रपटासाठी त्यांना चांगले पैसे भेटणार होते. म्हणून हेमा मालिनीने काहीह विचार न करता त्या चित्रपटाला होकार दिला. मुंबईपासून दुर एका ठिकाणी त्यांनी चित्रपटाची शुटींग पुर्ण केली.

हेमा मालिनीने चित्रपटांच्या निर्मात्यांकडे विनंती केली की, त्यांनी या चित्रपटाला मुंबईच्या बाहेर रिलीज करण्याची विनंती केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. त्यामूळे त्यांना अनेक बी आणि सी ग्रेड चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

सुरुवातीला त्यांनी सर्व चित्रपटांना नकार दिला. पण नंतर मात्र त्यांनी बी ग्रेड चित्रपट केले. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इनकम टॅक्सचा दंड भरायचा होता. त्यामूळे त्यांनी त्यांच्या प्रतिमेता विचार न करता चित्रपट केले.

काही वर्षांमध्ये त्यांनी दंड पुर्ण केला आणि अभिनय क्षेत्रापासून दुर गेल्या. एकेकाळी बॉलीवूडमध्ये राज्य करणाऱ्या आणि आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या हेमा मालिनींना देखील पैशांसाठी बी ग्रेड चित्रपटांमध्ये करावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.