सुरुवातीला स्कुटर आता ४ हेलिकॉप्टर, २ जेट विमाने, जाणून घ्या गौतम अदानी यांचा इतिहास

उद्योगपती गौतम अदानी काही काळातच श्रीमंताच्या यादीत जाणून बसले आहेत. मात्र त्यांनी देखील सुरुवातीचे दिवस अगदी गरिबीत काढले होते. सुरुवातीला चाळीत राहणे, स्कूटरवर फिरणे, मुंबईला ३०० रुपयांत नोकरी करणे इथंपासून आता स्वतःच्या मालकीची दोन जेट विमाने आणि ४ हेलिकाॅप्टरपर्यंत गौतम अदानींनी प्रवास केला आहे.

गुजरातच्या अहमदाबादमधील पोल परिसरात एका चाळीत, एका गरीब जैन कुटुंबात २४ जून १९६२ मध्ये गौतम अदानींचा जन्म झाला. ते शिक्षण अर्धवट सोडून १६ वर्षांचे असताना मुंबईला आले. त्यांनी हिंद्रा बदर्समध्ये ३०० मासिक पगारावर काम सुरू केले.

त्यांनी मुंबईच्या डायमंड इंडस्ट्रीमध्ये स्वतःला आजमविण्याचा प्रयत्न केला. पण, दरम्यानच्या काळात मोठ्या भावाने प्लॅस्टिकचा व्यापार सुरू केला होता, त्यामध्ये काम करण्यासाठी गेले होते. नंतर १९८८ मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्हेंचर सुरू केले. याच वर्षी अदानी ग्रुपची स्थापना केली.

अदानी ग्रुपने १९९१ नंतर वीज, कोळसा, गॅस, तेल या क्षेत्रांकडे लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर अदानी ग्रुपचा विस्तार प्रचंड झाला आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत ग्रुप म्हणून नावारुपास आला. अदानी ग्रुपमध्ये एकूण ६ कंपन्या आहेत.

या कंपन्यांच्या भांडवलांची किंमत ही ८० अब्ज डाॅलर इतकी आहे. कंपन्यांचे शेअर्सचे भाव वधारले आणि अदानींच्या एकूण संपत्तीत ५०० टक्क्यांनी वाढ झाली. त्यात गौतम अदानींचा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. इथंच अदानी ग्रुप थांबला नाही, तर त्यांच्या अनेक कंपन्यांनी देशातील अनेक बंदरं विकत घेतली आहेत. देशाबाहेर देखील अनेक कंपन्या त्यांनी घेतल्या आहेत.

आशिया खंडातील १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. अदानी यांची संपत्ती ३३.७ अब्ज डाॅलरवरून ६६.५ अब्ज डाॅलरपर्यंत गेली आहे. ४ लाख ८४ हजार करोड रुपये इतकी संपत्ती गौतम अदानी यांची आहे.

गौतम अदानी आपल्या आलिशान घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी हेलिकाॅप्टरचा वापर करतात. त्यांच्याकडे ४ हेलिकाॅप्टर, दोन जेट विमानं, फरारी, बीएमडब्ल्यू, रोल्स राॅयल्स, लिमोझिन कंपन्यांच्या आलिशान कार आहेत. जगभरात अनेक आलिशान बंगले आहेत.

ताज्या बातम्या

पुण्यात साधी नोकरी करणारा युवक कसा झाला ‘देवमाणूस’; नकारात्मक पात्र असूनही करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य

‘पुन्हा शेपमध्ये येण खरच अवघड आहे का? नुकतच मातृत्व अनुभवलेल्या धनश्री कडगावकरने स्त्रियांना दिला मोलाचा सल्ला

साथ असावी तर अशी; आजी आजोबांचा हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.