पावसाचा बीडकरांना मोठा फटका; तब्बल 15 हजार क्विंटल साखल भिजली; कोट्यावधींचे नुकसान

बीड। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढत चालल्याने अनेक ठिकाणी नदी, नाल्यात प्रचंड पूर आला आहे. कित्येक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.

अशातच बीडमधून एक माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आनंदगाव (सारणी) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने 6 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते. मात्र बीडमध्ये धो धो पाऊस कोसळत असल्याने मुसळधार पावसामुळे तब्बल 15 हजार क्विंटल साखर भिजल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील अनेक जिल्हातील गावांमध्ये पावसाने दहशत निर्माण केली आहे,. अशातच पावसामुळे येडेश्वरी कारखान्याचा परिसरात पाणीच पाणी झाले. यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या 173208 क्विंटलच्या गोदामात पाणी शिरले. गोदामात पाणी शिरल्यामुळे गोदामातील 30 हजार पोते साखर भिजली.

गोदामातून पाणी बाहेर काढण्याचा गोदामातील चाळीस ते पन्नास जण प्रयत्न करत होतो. मात्र पाणी बाहेर निघायला अडचणी आल्या आणि पाणी गोदामात शिरले अशी माहिती गोदाम व्यवस्थपकांनी दिली आहे. 51 हजार पोते खराब होतील असा अंदाज कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

तरी आजपासून पुढचे ४ दिवस राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊसाचा अदांज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊसासह वीजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आज पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता आहे.

 महत्वाच्या बातम्या
अमिताभ बच्चनसाठी माधूरी दिक्षितने अनिल कपूरला सोडले; पण अमिताभने चित्रपट केला बंद
दोन डोसमधील अंतर कोणाच्या सांगण्यावरून वाढवले? तज्ञ म्हणाले, आम्ही शिफारस केलीच नाही
दोन डोसमधील अंतर कोणाच्या सांगण्यावरून वाढवले? तज्ञ म्हणाले, आम्ही शिफारस केलीच नाही
धक्कादायक! कुंभमेळ्यातील १ लाख कोरोना चाचण्या बनावट, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.