मुंबईसह महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

 

मुंबई। मुंबईसह महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मिळालेल्या माहिती नुसार मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

या पावसामुळे आता मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीचा अंदाज घेतला आहे.

त्यानुसार पुढच्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे इशारे देण्यात आले आहेत. मुंबईत आज साडे अकरापर्यंत चांगला पाऊस पडला, अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे.

मुंबईत दोन दिवस (३ आणि ४ जुलै) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.