राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढचे ३ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस!

मुंबई | आता कुठे राज्यातील पाऊसाचा जोर कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा १० ते १३ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊसाचा जोर कमी असेल, आणि मराठवाड्यात पाऊसाच्या हलक्या सरी बरसतील असे सांगण्यात आले आहे.

४ ते ६ ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पाऊसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पाऊसाने तर पूरस्थिती निर्माण होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र काही कालावधीनंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली.

पण आता पुन्हा एकदा १० ते १३ ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि कोकणांत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच पुढचे ३ दिवस राज्यात विदर्भ आणि कोकणात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.