येत्या 4 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक भागांतील नद्याही ओसंडून वाहताना दिसत आहे.

काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील 4 दिवसांत काही भागात मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

19 ऑगस्टला उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी आहे.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, पुणे, सिंधदुर्ग, नाशिक, नंदुरबार, जळगाव, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत पुढील 4 दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.