भारीच! कोविशील्ड घेतलेल्यांची चिंता मिटली; नवीन अभ्यासातून आली दिलासादायक माहिती समोर

मुंबई। देशात गेले वर्ष दिड वर्ष कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांचा कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी देशात जास्तीत जास्त लसीकरण मोहिमवर भर दिला जात आहे. मात्र अनेकांच्या मनात लसीकरणाबाबत शंका निर्माण होत होती.

खरोखरच लसीमुळे फायदा होतो का किंवा ती किती गुणकारक आहे हे अनेकांच्या मनात येत असते. याच दरम्यान आता महत्वाची माहिती समोर येत आहे की, अॅस्ट्राझेनेकाकडून तंत्रज्ञान मिळाल्यानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) तयार केलेल्या कोविशील्डला भारतात 2/3 इम्युनो-ब्रिजिंग अभ्यासात इव्हॅलुएट करण्यात आले होते.

AZD1222 च्या तुलनेत कोविशील्डमध्ये एक नॉन इंफीरियर इम्यून रिस्पॉन्स आहे. त्यामुळे कोविशील्ड देखील इतर लसींप्रमाणे प्रतिकारशक्ती निर्माण करत असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे आता कोविशील्ड लस घेतलेल्या नागरिकांसाठी ही आनंदाची माहिती समोर आली आहे.

25 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2020 दरम्यान 1601 स्वयंसेवकांवर अभ्यास करण्यात आला होता. यानंतर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) नॅशनल ड्रग रेग्युलेटरच्या विषय तज्ज्ञ समितीने मंजुरीची शिफारस केल्यानंतर, या वर्षी 3 जानेवारी रोजी कोविशील्डला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली.

व त्यानंतर संपूर्ण देशात कोविशील्ड लसीला सुरुवात झाली. मात्र अनेकांना ही लस कितपत परिणामकारक आहे, किंवा याची प्रतिकार शक्ती किती आहे याबद्दल अनेकांना शंका होती मात्र आता याबद्दल हीच शंका दूर झाली आहे. दरम्यान आता खरी लस ओळखता यावी, यासाठी केंद्राने सर्व आवश्यक माहिती राज्यांना दिली आहे.

यावरून, आपण घेतलेली लस खरी आहे, की बनावट हे ओळखता येईल. लस खरी आहे, की बनावट हे ओळखण्यासाठी कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूतनिक-व्ही, या तिन्ही लसींवरील लेबल, त्यांचा कलर, ब्रँडचे नाव यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

बनावट लसीचे प्रमाण वाढलं असल्याने लस खरी कशी ओळखावी याची माहिती दिली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना, लस खरी आहे की बनावट हे ओळखण्यासाठी स्टॅंडर्ड्स सांगितली आहेत, व त्याच्या आधारे आपल्याला दिली जात असलेली लस खरी आहे की बनावट हे समजू शकेल.
महत्वाच्या बातम्या
सावधान! ‘या’ तारखेपर्यंत इनकम टॅक्‍स रिटर्न नाही भरला तर भरावा लागणार जाणार ‘जबर’ दंड
‘माझ्या मुलानं मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्स या गोष्टी देखील कराव्या’- शाहरुख खान
करुणा शर्मा प्रकरण: चालक अरुण मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
धक्कादायक! भाजप नेत्याच्या पत्नीवर माकडांचा हल्ला; हल्ल्यात पत्नीचा दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.