हृदयद्रावक! भगत सिंह यांची भूमिका साकारताना चिमुरड्याचा गळफास लागून तडफडून मृत्यू

बदायू। नाटक म्हटलं तर अभिनय करणारे नाटककार अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत असतात. त्यांचा पेहराव, त्यांची भाषा, त्यांचे हावभाव या सगळ्या गोष्टी एका नाटककाराला त्याच्या अभिनयात साकाराव्या लागतात. त्यामुळे आपलं नाटक कसं चांगलं होईल याकडे सगळे नाटककार व निर्माते पाहत असतात.

त्यामुळे याची तालीम करण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना सतत सराव करावा लागतो. मात्र हिचं नाटकाची तालीम एका चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वीर शहीद भगत सिंह यांच्यावरील नाटक सादर करता यावं यासाठी त्यांच्या जीवनावर अधारित नाटकाची रंगीत तालीम सुरू असताना एका चिमुकल्याचा फास लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील बदायू येथील ही घटना असून मृत्यूमुखी पडलेल्या 9 वर्षीय मुलाचं नाव शिवम असं आहे. प्रत्येकवर्षी वेगवेगळ्या दिनानिमीत्त शाळेत कार्यक्रम साजरे केले जातात. असच शिवमच्या शाळेत देखील 15 ऑगस्ट दिनानिमित्त देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

शिवम आणि त्याच्या काही मित्रांनी वीर शहिद भगत सिंह यांच्या जीवनावर अधारित नाटक करण्याच ठरवलं होतं. तर शिवम हा भगत सिंहाची भूमिका पार पाडणार होता. भगत सिंहाना फाशी दिलेल्या घटनेची रंगीत तालीम करण्यासाठी शिवम स्टूलवर चढला होता. यावेळी गळ्याभोवती दोरी अडकल्यानंतर, अचानक त्याच्या पायाखालील स्टूल सरकला.

ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती फास घट्ट झाला. शिवमला खरोखर फास लागला व शिवमचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी त्याचे काही मित्रदेखील घटनास्थळी दाखल होते मात्र ते शिवमची काहीच मदत करू शकते नाहीत. मात्र या घटनेनं शिवमच्या कुटुंबासोबत संपूर्ण परिसरात राहणाऱ्या लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र हा अपघात असल्यानं शिवमच्या घरच्यांनी कोणाविरोधातही तक्रार दाखल केली नाही.
महत्वाच्या बातम्या
बाबो! वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या आजोबांनी बांधली 40 वर्षीय महिलेशी लग्नगाठ
देशातील हर चौथा मुसलमान भिकारी आहे – संजय राऊत
हेच खरे हिरो! बाळाला कडेला घेऊन कॉलेजमध्ये शिकवतो हा बाप, कारण ऐकून येईल डोळ्यात पाणी..
बॉक्स ऑफिसवर होणार युद्ध! प्रभास, महेश बाबू, आणि पवन कल्याणचे चित्रपट एकाच दिवशी होणार रिलीज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.