हृदयद्रावक! रेल्वे रुळांवर पडलं होतं तरूणाचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच सर्व हादरले

झांसी। अनेकजण आपल्या जीवाला कंटाळून किंवा घरगुती वादावरून आत्महत्या करत असल्याचे आपण पाहतो. मात्र काही लोक आत्महत्या करण्यामागचं कारण अनेकांना समजत नसत. मात्र कित्येक लोक आपला जीव गमवण्यापूर्वी सुसाईड नोट लिहीत असतात.

व आत्महत्या करत असतात. अशाच एक मृतदेह रेल्वे रूळावर सापडल्याची घटना समोर आली आहे. मात्र या व्यक्तीने ज्या कारणासाठी आपला जीव दिला आहे, ते कारण वाचून सगळ्याना धक्का बसला आहे. ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधील झांसी शहरातील आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एका तरूणाचं शव रेल्वे रुळावर काही लोकांना दिसलं. मात्र त्या युवकाच्या खिशातील चिठ्ठी वाचून सर्वच हळहळले. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण हिंदू असून एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.

दोघांनी गुपचूप लग्नही केलं होतं. या नात्याला समाज आणि कुटुंबामध्ये मान्यता नव्हती, यामुळे त्या तरूणानं हे पाऊल उचललं. संंपूर्ण माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

त्यांना एक सुसाइड नोटही सापडली होती, ज्यात त्या तरूणाने आपला मृत्यू होण्यापूर्वी भावनिक गोष्टी लिहिल्या आहेत. काय होत चिठ्ठीत पाहूयात…

” मी जीवन संपवतोय पण माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या आपल्या बाळाला नक्की जन्म दे” असं या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझी चिंता करू नकोस, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. माझ्या विनंतीनुसार आपल्या मुलाला जन्म द्यावा हीच विनंती.

मी इथून जात आहे, पण मी नेहमी तुझ्या मनात आहे. माझ्या मरणानंतर पुन्हा लग्न करू नकोस” असं या चिठ्ठीत म्हंटल आहे. युवकाच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. व ही चिठ्ठी वाचताचं अनेकाचे डोळे पाणावले आहेत.

महत्वाच्या बातम्या
‘लगान’ चित्रपटातील गौरी आठवते का? एका चुकीमूळे बॉलीवूड सोडावे लागले होते
लग्न झाले मात्र ‘या’ कारणामुळे नवरी सासरी गेली नाही, अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना
पुस्तक सोड, चखना आन, तुझा मुलगा कुठे कलेक्टर होणार आहे? पण तोच मुलगा झाला कलेक्टर, जाणून घ्या…
पुस्तक सोड, चखना आन, तुझा मुलगा कुठे कलेक्टर होणार आहे? पण तोच मुलगा झाला कलेक्टर, जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.