हृदयद्रावक! ‘जीवनाचा शेवट करतेय, कारण विचारू नका’ व्हिडिओ शेअर करत तरुणीची आत्महत्या

लातूर। लातूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्म्हत्या केली आहे. मात्र तिने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून आपल्या भावना व दुःख व्यक्त केलं आहे.

आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलीस तपास करत आहेत. मृत मुलीचं नाव सोनू असून ती लातूरच्या एका खाजगी महाविद्यालयात बी ए च्या द्वितीय वर्षाला मुलगी शिक्षण घेत होती. आता हे सगळं मला सहन होतं नाही.

त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अस व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

“जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये… मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे, की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी… कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल” असं सोनू आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.

यानंतर आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोनूची आई व वडील वेगवेगळे राहत असल्याने आत्महत्या करण्याच्या वेळेस घरी कोणीही नव्हतं. तसेच सोनूच्या आईला कोणीतरी फोनवर बोलत होतं, यामुळे त्यांच्यात भांडणही झालं होतं.

यातूनच सोनुने टोकाचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
अंगावर साडी अन् डोक्यावर पदर; पहा या महिलेची लक्झरी ड्रायव्हिंग
Kia च्या इलेक्ट्रिक गाड्यांची काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, एकदा चार्ज केली की धावते ५१० किमी…
रतन टाटा देखील ‘या’ २८ वर्षाच्या तरुणाकडून घेतात सल्ला, जाणून घ्या कारण…
तुझे करिअर संपवल्याशिवाय शांत बसणार नाही! अभिनेत्याची सलमान खानला धमकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.