ह्रदयद्रावक! नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चौघांचा मृत्यु, परिसरात हळहळ

नेपाळ मधील बेपत्ता विमान अखेर सापडलं आहे. मुस्तांग जिल्ह्यातील येथे दुर्घटनाग्रस्त विमान नेपाळ लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात यश आलं आहे. आतापर्यंत या अपघातातील २२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. या विमानामध्ये ४ भारतीयांचा समावेश आहे.

विमानाचा खराब हवामानामुळे अपघात झाला आहे. एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानात २२ प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये ४ भारतीय २ जर्मन, ३ क्रु मेंबर आणि  नेपाळी लोक प्रवास करतं होते. या विमानामधील सगळ्याच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दुर्घटनाग्रस्त विमानाचे लहान-लहान तुकडे झाले आहेत.  सोमवारी या घटनेचे फोटो  समोर आले आहेत.  या घटनेचे फोटो समोर आल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील ठाणे मधील राहणारे अशोक कुमार त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीसह दोन मुलांचा नेपाळमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

अशोक आपवी पत्नी वैभवीपासून वेगळे राहत होते. विमान अपघातामुळे या दोघांच्या मिलनाचा वेदनादायक अंत झाला आहे. ५४ वर्षीय कुमार त्रिपाठी ओडीशामध्ये  कंपनी चालवत होते. मुंबई शेजारील ठाणे शहरात रहाणाऱ्या ५१ वर्षीय वैभवी बांदेकर त्रिपाठी या आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहात होत्या. वैभवी बांदेकर आपल्या मुलांना घेऊन नवऱ्याला भेटायला गेल्या होत्या.

वैभवी बांदेकर आणि त्यांंचा २२ वर्षीय मुलगा धनुष आणि १५ वर्षीय मुलगी रितिका हे  ठाणे शहरातील बलकम भागामधील रुस्तमजी अतिना अपार्टमेंटमध्ये राहत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, त्याच्या कुटुंबातील आता ८० वर्षीय आई ह्या एकमेव व्यक्ती जिवंत आहेत.

८० वर्षीय आजींची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांना विमान अपघाताबाबत काहीही सांगितले नाही. अशोक त्रिपाठी, वैभवी आणि त्यांची दोन मुले रविवारी तारा एअरलाइन्सच्या विमानात चढले होते, ज्यांचे मृतदेह सोमवारी नेपाळच्या डोंगराळ जिल्ह्यात मुस्तांग येथे सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या:-
भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”
‘…तर घरात घुसून बदडून काढू,’ भाजपचा दीपाली सय्यद यांना गर्भित इशारा
काहीही झालं तरी भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे, IPL जिंकताच पांड्याचा आत्मविश्वास बळावला